आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड सुरू करत आहे ‘हर घर एसआयपी’ उपक्रम
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने (एबीएसएलएमएफ), दीर्घकालीन संपदासंचयाचे स्वप्न वास्तवात आणण्याची क्षमता व्यक्तींना प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘हर घर एसआयपी’ हा उपक्रम सुरू केला आहे. मग त्या व्यक्ती मोठ्या असोत किंवा लहान असोत. एबीएसएलएमएफने आपल्या भारतभरातील शाखांमध्ये हा कार्यक्रम सुरू केला आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. बालसुब्रमणियन या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना म्हणाले, “प्रत्येक कुटुंबाला, आर्थिक शिस्तीचा मोबदला दीर्घकाळ देत राहणाऱ्या उत्पादनामध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्याची सवय लावण्याप्रती, आम्ही एबीएसएलएमएफच्या माध्यमातून बांधील आहोत. हाच उद्देश डोक्यात ठेवून आम्ही भारतभरात ‘हर घर एसआयपी’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या काही महिन्यांत, आमचे दमदार क्षेत्र वितरण पथक ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा संपदासंचयासाठी होणारा लाभ समजावून देणार आहे. प्रत्येक व्यक्तीचे दीर्घकालीन संपदासंचयाचे स्वप्न वास्तवात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड- दीर्घकालीन गुंतवणूकदारांमधून ‘कोट्यधीश’ निर्माण करणारी योजना.
|
१०,००० रुपयांचा मासिक एसआयपी |
स्थापनेपासूनची वर्षे |
गुंतवलेली एकूण रक्कम (रुपयांत) |
३१ मे, २०२३ या तारखेला असलेले मूल्य (रुपयांत) |
|
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रण्टलाइन इक्विटी फंड |
२१ |
२४.९ लाख |
१.६ कोटी |
|
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्लेक्झिकॅप फंड |
२५ |
२९.८ लाख |
४.५ कोटी |
|
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल फंड |
२३ |
२८.१ लाख |
२.५ कोटी |
स्रोत: आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेड, ३१ मे २०२३ या तारखेनुसार
नवीन मिलेनियल्सपैकी दोन तृतीयांश त्यांचा गुंतवणूकीचा प्रवास सुरू करण्यासाठी इक्विटी योजनांमधील एसआयपींना पसंती देत आहेत, असे अलीकडील सीएएमएस अहवालातून पुढे आले आहे. रोचक बाब म्हणजे, मिलेनियल्समधील दर तिसऱ्या व्यक्तीला एकरकमी गुंतवणूक करण्याचे महत्त्व पटलेले आहे.
एसआयपी योजना कशा यशस्वी होत आहे याचे एक उदाहरण येथे दिले आहे. जर एखाद्याने २००० सालाच्या सुरुवातीपासून दर महिन्याला १०,००० रुपयांची बचत केली तर ३१ मार्च २०२३ या तारखेपर्यंत एकूण २७.८ लाख रुपयांची बचत जमा होईल. त्याऐवजी त्याच व्यक्तीने निफ्टी फिफ्टी टीआरआयच्या एसआयपीमध्ये दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवले तर जमा झालेल्या गुंतवणूकीचे मूल्य तेवढ्याच कालखंडात १.८ कोटी रुपये झाले असते.
बाजार अनेकदा गडगडला, आर्थिक मंदी आली किंवा अगदी कोविडसारखी साथ आली तरीही, निफ्टी फिफ्टी टीआर इंडेक्सने वर नमूद केलेल्या कालखंडात १२.६ टक्के एवढ्या संयुक्त वार्षिक वाढीचा दर निर्माण केला आहे.
निफ्टी फिफ्टी टीआरआयचा गेल्या २२ वर्षांतील ऐतिहासिक अभ्यास असे दर्शवतो की, ज्यांनी ५ वर्षांहून अधिक काळ पैसा गुंतवला, त्यांना एसआयपीने सकारात्मक मोबदला दिला आहे, १०-१२ वर्षांच्या काळासाठी पैसा गुंतवून ठेवणाऱ्यांना १० टक्क्यांहून अधिक मोबदला प्राप्त झाला आहे.
