Monday, June 15, 2026
BusinessLatest News

एनएसई ने महाराष्ट्र शासन आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबत सामंजस्य करार केला

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) ने आज महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग (HTED) आणि मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) यांच्या सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलुंबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना संबंधित आणि व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे, त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यास सक्षम करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले, “आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. एनएसई आणि मनीबी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखों लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र हे पाहिले राज्य असल्याने या उपकरांच्या माध्यमातून सायबर फसवणूक टाळण्यासाठी पॉन्झी योजनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणूक कशी व कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी मी एनएसई आणि मनीबी इंस्टीट्यूटचे अभिनंदन करतो.”

  नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिषकुमार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आणि मनीबी इंस्टीट्यूटसोबतचा आजचा सामंजस्य करार गुंतवणूकदारांच्या जागरूकता व आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या कटीबद्धतेचे प्रतीक आहे. आम्ही आमच्या सहभागीदारीच्या प्रवासाला सुरुवात केल्याने, गुंतवणूकदारांना सशक्त आणि सुसज्ज करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि चांगले निर्णय घेण्यासाठी संबंधित माहितीने सुसज्ज करू.”

मनीबी इंस्टीट्यूट प्रायवेट लिमिटेड (Moneybee Institute Pvt. Ltd.) चे संचालिका सुश्री शिवानी दाणी वाखरे म्हणाले, “महाराष्ट्र हे अशा प्रकारे आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व आणि एनएसईचा पाठिंबा यामुळे ते क्रांती घडवून आणेल आणि महाराष्ट्रातील नागरिकांची फसवणूक टाळेल.”

आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि नवीन, संभाव्य व विद्यमान गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटिज बाजारात शिक्षण व जागरूकता वाढविणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading