Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टलचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलील, फौजिया खान, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झा, सदस्य समीर काजी, मुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने राज्यभरातील वक्फ संस्थेच्या प्रतिनिधींना औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर व्हावी व वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने एक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम विभागाने हाती घेतले. त्यानुसार आता “ऑनलाईन-नोंदणी” ची सुविधा https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading