Friday, June 19, 2026
Latest NewsSports

एचआरकॅपिटा सोल्युशन्स्, एलके इलेव्हन संघांचे विजय!!

पुणे : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचआरकॅपिटा सोल्युशन्स् आणि एलके इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात अभिमन्यु ढमढेरे याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाने ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा १२ धावांनी पराभव केला. एचआरकॅपिटा सोल्युशन्स् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावांचा डोंगर उभा केला. निखील शिंदे याने ६८ धावांची तर, अभिमन्यु ढमढेरे याने ३० चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांची खेळी करून संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा डाव २०५ धावांवर मर्यादित राहीला. मोहम्मद अझरूद्दीन याने ५२ धावांची तर, यश तौसाळकर याने नाबाद ४८ धावांची खेळी केली पण, संघाचा विजय १२ धावांची दूर राहीला.

गिरीष कोंडे याच्या ११४ धावांची शतकी खेळीच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने ब्राईट इलेव्हन संघाचा ४३ धावांनी सहज पराभव केला. गिरीष कोंडे याच्या ४५ चेंडूतील १० चौकार आणि १० षटकारांसह साकारलेल्या ११४ धावांच्या खेळीमुळे एलके इलेव्हनने १९७ धावांचे आव्हान उभे केले. गिरीष कोंडे याला दुसर्‍या बाजूने हृषीकेश आगाशे याने ४९ धावा करून सुरेख साथ दिली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ६९ चेंडूत १३४ धावांची भागिदारी रचली. या आव्हानासमोर ब्राईट इलेव्हनचा डाव १५४ धावांवर गुंडळला गेला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एचआरकॅपिटा सोल्युशन्स्ः २० षटकात ५ गडी बाद २१७ धावा (निखील शिंदे ६८ (४९, ११ चौकार), अभिमन्यु ढमढेरे ६३ (३०, ६ चौकार, ४ षटकार), रोहीत रनारे नाबाद २३, भूषण कडू २-४६) वि.वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद २०५ धावा (मोहम्मद अझरूद्दीन ५२ (२८, ७ चौकार, ३ षटकार), यश तौसाळकर नाबाद ४८ (१९, ३ चौकार, ४ षटकार), श्रीनाथ गोपाकुमार ३१, प्रफुल्ल मानकर ३-२५, स्नेहलकुमार कासार २-३७); सामनावीरः अभिमन्यु ढमढेरे;

एलके इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद १९७ धावा (गिरीष कोंडे ११४ (४५, १० चौकार, १० षटकार), हृषीकेश आगाशे ४९, निनाद फाटक ४-२८, शुभम हरणे ३-३५);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी गिरीष आणि हृषीकेश १३४ (६९) वि.वि. ब्राईट इलेव्हनः १९.५ षटकात १० गडी बाद १५४ धावा (निलेश माळी ४३, कुशल असबे २०, अभिजीत कुलकर्णी ३-२९); सामनावीरः गिरीष कोंडे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading