Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरती व गणेश याग

पुणे : शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्रातील युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुणे शहर युवासेनेने “गणेश याग” आयोजित केला होता. या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिवसेना उपनेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष महाआरती केली.

युवा सेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच आदित्य साहेबांची भावी वाटचाल अधिक दिमाखात होण्यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केल्याची त्यांनी सांगितले. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी कायमच सदिच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

मा. आदित्यजीनी आपले आयुष्य पर्यावरण आणि वातावरणीय बदल या जागतिक स्वरूपाच्या विषयाला समर्पित केले आहे. या विभागाचे मंत्री असतानाही त्यांनी याबाबत अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. पुण्यातील वेताळ टेकडीच्या सामाजिक प्रश्नावरही त्यांनी पुढाकार घेतला आहे.

पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच दिनांक १३ जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून हा याग सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे पुणे शहर युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.या उपक्रमासाठी पुणे शहर युवा सेनेचे राम थरकुडे, युवराज पारिख आणि शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले,ज्योती चांदेरे, प्रा. विद्या होडे, दिपाली राऊत,संगीता भिलारे, कविता आंब्रे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

या उपक्रमासाठी पुणे शहर युवा सेनेचे राम थरकुडे, युवराज पारिख आणि शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या स्वाती ढमाले,ज्योती चांदेरे, प्रा. विद्या होडे, दिपाली राऊत,संगीता भिलारे, कविता आंब्रे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading