Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

‌‘कालजयी’ कार्यक्रमाअंतर्गत शब्द-चित्रातून उलगडले  पंडित कुमार गंधर्व

पुणे : लोकसंगीतातील धूनउगम रागांवर पंडित कुमारजींनी पितृतुल्य प्रेम केलेसंगीतातील सादरीकरण करताना ते समयचक्राविषयीसिद्ध आणि शुद्ध राग सादर करण्याविषयी आग्रही होतेत्यांना अमूर्ततेचे आकर्षण होतेपंडितजी कलाकार म्हणून युगपुरुष होतेपरंतु व्यक्ती म्हणून अतिशय साधेभाबडे पण शब्दाला पक्के होतेअशा भावना युगप्रवर्तकविख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या सुहृदांनी व्यक्त केल्याकुमार गंधर्व यांची गायकी दृकश्राव्य चित्रफितीतून अनुभवायला मिळाल्याने उपस्थित भावूक झालेकार्यक्रमास संगीतकला क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित होते.

कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे ‌‘कालजयी‘ कार्यक्रमाअंतर्गत रविवारी सायंकाळी नॅशलन फिल्म अर्काइव्ह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होतेयात शास्त्रीय गायिका अलका देवमारुलकरयुवा संगीतकार सृजन देशपांडेचित्रकार आणि संगीतप्रेमी जयंत भीमसेन जोशीपंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश  मुकुल मुद्गल,  लेखक सोपान जोशी,  लेखिका माधुरी पुरंदरे यांचा सहभाग होतात्यांच्याशी रेखा इनामदारसाने यांनी संवाद साधला.

अलका देव – मारुलकर म्हणाल्याकुमारजींची कलंदर वृत्ती त्यांच्या गायनातूनही दिसून येत असेप्रत्येक रागात सगळे स्वर लागतात ही मोठी शिकवण त्यांच्याकडून मला मिळालीगायनामध्ये गायकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबीत होणे ही दिव्य घटना आहे असे ते मानतगायकाने आवाज घडविण्याची गरज नाही कारण त्यात मूळ आवाज हरवून जातोगरज नसलेल्या रागांमध्ये खर्जाचा वापर करू नयेनवरागजोडरागांची निर्मिती सारासार विचार करून करावी या विषयी त्यांची स्पष्ट मते होती.

जयंत भीमसेन जोशी म्हणालेकुमारजी फार रितीचे होतेत्यांच्यात तेजअभिरुचीचपलता होतीते आनंदाचा अर्कहोतेगायनातून त्यांनी स्वतआनंद घेतल्यामुळे ते रसिकांनाही आनंद देत असतकमीत कमी सूरांमध्ये अचूकतेने रागाचे विश्व उभे कराण्याची जादू कुमारजींकडे होतीकुमारजी आध्यत्मिकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर होते.

कुमारजी छोट्याछोट्या गोष्टीतून आनंद घेत असल्याचे सांगून मुकुल मुद्गल म्हणालेनिसर्गपशुपक्षी यांची त्यांना आवड होतीअचूकता आणि दिलेला शब्द आणि वेळ पाळणे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होतीखाणे आणि खिलविणे याची त्यांना विशेष आवड होती.

कुमार गंधर्व यांच्याविषयीच्या ‌‘कुमारस्वर एक गंधर्व कथा‘ या पुस्तकाची निर्मिती कशी झाली याचे विवेचन करून माधुरी पुरंदरे म्हणाल्यामाझा  कुमारजींचा परिचय नव्हतात्यांना मी मैफलीतच पाहिले होतेहे पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी लिहायचे आहे हा विचार मनात ठेवून कुमार गंधर्वांची साधीसरळ गोष्ट सांगावी अशा विचाराने मी लिहिती झालेया पुस्तक निर्मितीतील कालावधीत मी कुमार गंधर्वमय होऊन आनंद उपभोगला.

सोपान जोशी यांनीही कुमार गंधर्व यांच्याविषयी ‌‘शिवपुत्र कथा‘ हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले असून त्या विषयी बोलताना ते म्हणालेआजच्या पिढीला जीवन कसे जगता येते हे कळले पाहिजे या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्याचे ध्येय मनात ठरवले होतेविख्यात व्यक्ती बालकाप्रमाणे जगू शकतेआनंद घेऊ शकतेसहज असते हे आजच्या काळात पहायला मिळणे अवघड आहेत्यामुळे मोठेपण सहजतेने कसे निभावता येते याचे उदाहरण या पुस्तकातून वाचकांपर्यंत नक्की पोहोचेल.

पंडित कुमार गंधर्व समकालीन गायकांमध्ये वेगळे का वाटतात याचे सखोल चिंतन करत सृजन देशपांडे यांनी दृकश्राव्य माध्यमातून पंडितजींचे सांगीतिक जीवन रसिक श्रोत्यांपुढे उलगडले.

परिसंवादात सहभागी मान्यवरांचे स्वागत कलापिनी कोमकली आणि भुवनेश कोमकली यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading