Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शरद पवार यांना धमकी दिल्या प्रकरणी IT इंजिनिअरला अटक

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एक तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे . रविवारी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सागर बर्वे याला पु्ण्यातून अटक केली. सागर हा आयटी इंजिनिअर आहे.

शरद पवार यांना समाज माध्यमांमधून धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी सुळे यांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाच्या अकाउंटवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading