Thursday, June 4, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

पालखी सोहळ्यात भक्ती रंगात रंगले झी मराठीचे कलाकार 

पिंपरी -चिंचवड : जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे रविवारी प्रस्थान झाले. यामध्ये राम कृष्ण हरी.. असे म्हणत समस्त वारकरी भक्ती रंगात रंगले आहेत. झी मराठी कलाकारही त्या पालखीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

‘झी मराठी’ वाहिनी आपल्या मराठी परंपरेला जोपासतात ह्याचे प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या मालिकेतून व कार्यक्रमातून दिसून येते.  नुकतेच आकुर्डी येथे जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ह्यांच्या पालखीचे आगमन झाले त्यावेळी झी मराठी कलाकारही त्या पालखीत सहभागी झाले. त्यांनी वारकऱ्यांमध्ये सहभागी होऊन वारीच्या आनंद घेतला.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपती, ‘तू चाल पुढं’ मालिकेतील श्रेयस आणि मयुरी, ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतील अमुल्या आणि वेदांत, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधून अप्पी म्हणजेच कलेक्टर अपर्णा सुरेश माने ह्या मालिकेतील कलाकारांनी पालखी सोहळ्यात सर्व भक्तांचे मन:पूर्वक स्वागत केले, वारकऱ्यांसोबत फुगड्या घातल्या, हरिपाठ पठण केले, वारकऱ्यांची मनापासून सेवा केली. एकूणच काय तर कलाकार मंडळी वैष्णव मेळ्यात रमले. वारकरी मंडळींनी देखील त्यांना भरभरून प्रेम दिले व आशीर्वाद दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading