या अभिनेत्यानी केली “गार्बेज बॅग” च्या कपड्याची अनोखी फॅशन !
फॅशन च्या विश्वात अनोखी झलक दाखवणारे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आहेत. फॅशन च्या चर्चा या सगळ्यांचा होतात पण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी केलं तर त्याचा चर्चा या होणार आहे. अश्याच काहीश्या चर्चा सध्या करण कुंद्रा च्या फॅशन बद्दल होताना दिसतात कारण देखील तितकच खास आहे.” गार्बेज बॅग “
च्या हटके फॅशन ने या फॅशनिस्टांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेंड च्या बाहेर जाऊन नवा ट्रेंड सेट करून याने ही अफलातून फॅशन केली आहे. “गार्बेज बॅग” फॅशन कोणत्या खास कलाकारांनी केली हे बघू या !
कान्ये वेस्ट- अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट त्याच्या फॅशनच्या अनोख्या चॉईस साठी ओळखला जातो. जेव्हा त्याने पहिल्यांदा “गार्बेज बॅग” पोशाख परिधान केला तेव्हा त्याने लगेच लोकांचे लक्ष वेधून घेतले.

ब्रॅडली कूपर- अमेरिकन अभिनेता ब्रॅडली कूपर त्याच्या डॅशिंग फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याने नेहमीच त्याचा फॅशन शैलीच अनोखं प्रदर्शन केले आहे. परंतु त्याच्या “गार्बेज बॅग” फॅशन ने त्याला वेगळ्या स्तरावर नेले आहे.
करण कुंद्रा- जेव्हा फॅशनचा विचार केला जातो तेव्हा करण कुंद्रा च नाव नक्कीच घेतलं जात. इंडस्ट्रीमध्ये नेहमीच त्याचा फॅशन च्या अनोख्या चर्चा होतात म्हणून त्याला फॅशनिस्टा म्हटले जाते. अलीकडेच, करण कुंद्राने “गार्बेज बॅग” असलेला अनोखा ड्रेस घातला आणि त्याने सगळ्यांना थक्क केलं.
ट्रॅश-बॅग वरून इन्स्पयार असलेली ही फॅशन नक्कीच अनोखी आहे यात शंका नाही.सेलिब्रिटींनी त्यांची कलात्मक दृष्टी यातून दाखवत या ट्रेंड उत्तम तऱ्हेने सेट केला आहे.