Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा उपक्रमात CEAT महाराष्ट्र मोटार वाहन विभाग व MSRDC एकत्र 

मुंबई : अग्रगण्य टायर उत्पादक कंपनी CEAT लिमिटेडने आज महाराष्ट्र मोटार वाहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या सोबत महत्त्वाच्या महामार्ग रस्ते सुरक्षा उपक्रमासाठी आपले सहकार्य जाहीर केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करताना टायरची स्थिती नीट राखणे आणि व्यवस्थित हवा भरणे याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या संयुक्त प्रयत्नाचा उद्देश आहे. हा उपक्रम तीन महिन्यांसाठी हाती घेतला जाईल आणि महाराष्ट्रातील इतर महामार्गांचा समावेश करण्यासाठी त्याचा विस्तार केला जाईल.

समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, आरपीजी समूहाचे कॉर्पोरेट व्यवहार प्रमुख ऑलविन वाझ, CEAT च्या नाशिक प्रकल्पामधील प्लांट ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष श्रीनिवास पत्की, CEAT ग्लोबलचे मुख्य ग्राहक सेवा अधिकारी सुनील कुमार झा या मान्यवरांसह MSRDC आणि CEAT च्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. या उपक्रमांतर्गत, CEAT प्रवाशांना त्यांच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या ठिकाणी निश्चित कियोस्क जागी वाहनाचे टायर तपासण्यासाठी प्रोत्साहित करेल.  प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी CEAT खालील सेवा मोफत सादर करेल:

  • नायट्रोजन फिलिंग: कियॉस्क नायट्रोजन फिलिंग पुरवेल. त्यामुळे वाढीव कालावधीसाठी योग्य टायर प्रेशर राखण्यास मदत होते, हवा कमी झाल्यामुळे टायर निकामी होण्याचा धोका कमी होतो.
  • टायर वेअर तपासणी: प्रशिक्षित तंत्रज्ञ टायर्सच्या स्थितीची तपासणी करतील आणि झीज वा टायर फाटला आहे का हे बघतील. वाहनचालकांना त्यांच्या टायरच्या स्थितीची जाणीव आहे ना आणि गरज असल्यास ते आवश्यक उपाययोजना करत आहेत ना याची खात्री करतील.
  • व्हॉल्व्ह तपासणे आणि पंक्चर दुरुस्ती: टायरच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेशी तडजोड करू शकणार्‍या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी कियोस्क व्हॉल्व्ह तपासणी आणि पंक्चर दुरुस्ती सेवा देखील देणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी, हे किऑस्क शिर्डी आणि नागपूर टोल प्लाझा या महत्वाच्या ठिकाणी असून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत कार्यरत आहेत. CEAT लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मी नारायणन बी म्हणाले, “CEAT मध्ये आम्ही नेहमीच सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे आणि आमच्या नागरिकांकरता सुरक्षित दळणवळण  अनुभव सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढ चिंताजनक आहे. त्यावर उपाय म्हणून जागरूकता निर्माण करण्याची आणि रस्ता सुरक्षा सेवांची अंमलबजावणी करण्याची गरज आम्ही ओळखली. महत्वपूर्ण महाराष्ट्र मोटार वाहन विभाग आणि एमएसआरडीसी सोबत आमच्या भागीदारीद्वारे आम्ही समृद्धी महामार्ग आणि त्याही पलीकडे जाऊन वाहनचालकांमध्ये जबाबदार ड्रायव्हिंग पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. आम्ही सर्व वाहनांना प्रत्येक प्रवासापूर्वी या सुरक्षिततेच्या पैलूकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित करू इच्छितो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading