भयानक : प्रेयसीचा निघृण खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये व मिक्सरमध्ये …..
मुंबई : दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील मीरा रोड परिसरात माणुसकीचा थरकाप उडवणारी भयानक घटना उघडकीस आली आहे. लिव्हइन रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीचा निघृणपणे खून करून तिच्या शरीराचे तुकडे केले; अन् त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून विल्हेवाट लावल्याचा प्रकार घडला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर मीरा रोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. मनोज साने (वय 56) असे आरोपीचे नाव आहे. तर सरस्वती वैद्य (वय 32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
असा झाला खून प्रकरणाचा खुलासा
शेजाऱ्यांकडून मिळालेल्या प्रार्थयामिक माहिती नुसार, मीरा रोड परिसरात आकाशदीप इमारतीत मनोज आणि सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून लिव्हइन रिलेशशिपमध्ये राहत होते. काल रात्री मनोजच्या फ्लॅट मधून खूप घाण वास येत होता. तेव्हा शेजाऱ्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजवला होता. मात्र मनोजने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही वेळाने तो हेल्मेट, मास्क लावून मोठी बॅग घेवून दरवाजा लॉक करून बाहेर निघून गेला. मात्र तेव्हा शेजाऱ्यांना सरस्वती दिसली नाही. तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना फोन केला.
अशी करत होता मृतदेहाची विल्हेवाट
मनोजने सरस्वतीचा खून नक्की कधी केला ही अद्याप समजलेले नाही. पण सरस्वतीचा खून केल्यावर मनोजने तिच्या शरीराचे तुकडे केले. एवडे करून सुद्धा तो थांबला नाही. मृतदेहाचे तुकडे करून तो ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून उकडवायाचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. नंतर हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. या दरम्यान, मृतदेह कुजला आणि त्याचा वास आला अन् या प्रकरणाला वाचा फुटली.
