Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Breaking News : मान्सूनचे केरळ मध्ये आगमन

पुणे : केरळात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) नुकतीच केली आहे. साधारणत: 1 जूनला दाखल होणारा मान्सून चालू वर्षी एक आठवडा उशिराने दाखल झाला आहे. मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल, असे आयएमडीने यापूर्वी सांगितले होते. मान्सूनचा मार्ग अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने अडवला होता. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस मान्सून दाखल होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. पण आता बिपरजॉय  पाकिस्तानच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे मान्सूनचा केरळमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

IMD च्या माहीतीनुसार, केरळमध्ये ज्या ठिकाणी वादळ गेले होते तेथे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बुधवारी (7 जून) केरळ आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस आजदेखील कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरावर मान्सूनच्या ढगांचा दाट थर जमा झाला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मान्सूनची पूर्व रेषा ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचू शकते. असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading