तुळशीबागेत कापडी पिशवी वितरण मशीनची सुविधा
पुणे : श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या पुढाकाराने पुणे महापालिकेच्या सहकार्याने तुळशीबागेत कापडी पिशवी वितरण करणारी मशीन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे…. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तुळशीबागेत खरेदीसाठी येणारे नागरिकांना कापडी पिशवी स्वस्त दरात उपलब्ध व्हावी या उद्देशाने व्हेडींग मशिन ची सेवा देण्यात आहे…
दैनंदिन जीवनात प्लॅस्टीकचा कमित कमी वापर नागरिकांनी करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती होण्यास मदत होणार नाही…… तुळशीबाग गणपती येथे सदर मशीन नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे…
यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली सदर कार्यक्रमास मा.आशा राऊत उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा माधव जगताप उपायुक्त अतिक्रमण विभाग पुणे मनपा मा.महेश सुर्यवंशी मा.हेमंत रासने तसेच मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम , नितीन पंडित उपस्थित होते.
