अनिरुद्ध जोशीने संगीतबद्ध केले रमा राघव मालिकेसाठी एक स्पेशल गाणं
‘रमा राघव’या मालिकेत राघवची बहीण श्रुतीविरुद्ध रमाच्या आईने रचलेल्या षडयंत्रापासून रमाने श्रुतीला वाचवले,पण या सगळ्या प्रकरणात श्रुतीने वडील गजानन गुरुजींची नाराजी ओढवून घेतली. काही केल्या ती दूर होईना,तेव्हा हतबल झालेल्या श्रुतीला रमाने तिच्या गाण्याच्या कलेचा वापर करण्याचा कल्पना सुचवत तिच्या मनाला उभारी दिली. रमाच्या या कल्पनेने गजानन गुरुजींची नाराजी दूर होते का ? आणि पुरोहितांचे घर पुन्हा हसतखेळते करण्यात रमा यशस्वी होते का ? हे येत्या 8 जूनच्या भागात पाहता येईल. मराठीत मुळात वडिलांना साद घालणारी गाणी कमी आहेत,त्यामुळे या प्रसंगासाठी ऋचा मुळे यांनी लिहलेले एक विशेष गाणे संगीतकार अनिरूद्ध जोशी यांनी संगीतबद्ध केले असून रसिका जोशी यांनी गायले आहे.अत्यंत कमीत कमी वेळात साकारलेले सुरेल असे हे भावस्पर्शी गाणे या भागाचे वेगळेपण ठरणार आहे.
तेव्हा नक्की बघा उद्याचा भाग रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर!
