Tuesday, September 1, 2026
BusinessLatest News

सोनालिकाने मे महिन्यांमध्ये १३७०२ ट्रॅक्टरची सर्वाधिक केली विक्री

पुणे : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेला सोनालिका नाविन्यतेला चालना देण्यात आणि आपल्या ध्यास व दर्जेदार शेतकी अवजारांच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना आधार देण्यात सातत्याने सक्रिय राहिला आहे. एकंदर शेती अर्थव्यवस्थेबाबत सोनालिकाच्या असामान्य दृष्टीमुळे कंपनीला मेमधील आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १३७०२ ट्रॅक्टरची एकूण विक्री २०२३ मध्ये नोंदविणे शक्य झाले आहे. यात मे २३ मधील ११.४२ टक्के देशांतर्गत वाढीचा समावेश असून ती उद्योगाच्या वाढीच्या (अंदाजे २.७ टक्के) चारपट जास्त आहे. तसेच कंपनीने मे २२ मधील १२६१५ विक्रीचा स्वतःचाच विक्रमसुद्धा मोडला आहे.

भारतातील शेतीपैकी ४५ टक्के शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळे सोनालिका शेतीच्या यांत्रिकीकरणाचा जलद स्वीकार व्हावायावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी देशातील विविध प्रकारच्या मातीत अतुलनीय कामगिरीटिकाऊपणा आणि कार्यक्षमता असलेल्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरची निर्मिती करते. दर्जा आणि नाविन्यता यांच्या प्रति सोनालिकाची कटिबद्धता ही तिच्या जगातील क्रमांक एकच्या उत्पादन कारखान्यात समाविष्ट केलेली आहे. येथूनच उच्च तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर बाहेर पडतात आणि त्यांच्यावर १५० देशांतील १४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि मजबूत वितरण जाळ्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना आनंदी करणे आणि शेतीतील प्रत्येक कामातील गुंतागुंत कमीत कमी करणे हे लक्ष्य सोनालिकाने ठेवले आहे.

या नव्या कामगिरीविषयी बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणालेआमची आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १३७०२ ट्रॅक्टरची एकूण विक्री अभिमानाने नोंदविताना आणि देशांतर्गत उद्योगाच्या वाढीला चार पटीने मागे टाकताना आम्हाला आनंद होत आहे. या आदर्श कामगिरीतून भारतातील शेतीचे चित्र पालटून तिचे नेतृत्व करण्याच्या व शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची कंपनीची कटिबद्धता अधोरेखित होते. सरकारच्या विविध विकास योजनांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच सिंचनाखालील जमिनीचे प्रमाण पहिल्यांदाच  ५० टक्यापेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची नवीन तंत्रे अवलंबणे शक्य झाले आहे. उत्पादन लाइन आणि संबंधित शेती तंत्रज्ञानातील  महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे आम्ही प्रगतीशील वाढ करू शकलो आहोत आणि शेतकरी उत्पादकता आणि नफ्याच्या नवीन पातळी गाठतीलहे आम्ही सुनिश्चित करत राहू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading