सेतू अॅडव्हरटाईझिंगची उल्लेखनीय कामगिरी, टॉप-१० जाहिरात संस्थांमध्ये पटकावले स्थान
पुणे : जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य सेतू अॅडव्हरटाईझिंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुण्यातील या प्रसिद्ध जाहिरात संस्थेला गोवा फेस्ट २०२३ मध्ये तब्बल ९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गोवा येथे नुकताच संपन्न झालेल्या फेस्टिव्हलमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गोवा फेस्टमध्ये सेतूला अॅबी वनशो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जाहिरात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी सेतू अॅडव्हरटाईझिंगने पुरस्कारात बाजी मारली आहे. वर्षभरात जाहिरात क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सेतू या संस्थेला ५ रौप्य, ३ कांस्य आणि एक मेरिट पुरस्कार मिळाला आहे. गोवा फेस्टमध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळालेल्या संस्थांच्या यादीत सेतू अॅडव्हरटाईझिंग नवव्या स्थानावर आहे. अर्थात टॉप टेन मध्ये आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या प्रतिथयश संस्थांचा समावेश आहे. जसे, लिओ बर्नेट इंडिया, एफसीबी ग्रुप, माइंड शेअर इत्यादी.
सेतू अॅडव्हरटाईझिंगला वाघ बकरी चहा आणि सह्याद्री हॉस्पिटल या दोन कंपन्यांसाठी केलेल्या कामासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत. कंपनीला वाघ बकरी चहा आणि सह्याद्री हॉस्पिटलसाठी केलेल्या ब्रँडेड कंटेंट, डायरेक्ट रिस्पॉन्स, इंटरग्रेडेड आणि आउट ऑफ होम (ओओएच) यासारख्या जाहिरातींसाठी हे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून कंपनीच्या कामाला पावती मिळाली आहे.
