Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

दहावी परीक्षेत नॅशनल पब्लिक स्कुलचा सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकाल

पुणे : अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नॅशनल पब्लिक स्कुल (कात्रज जाधवनगर)चा निकाल दहावी(शालांत) परीक्षेत शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.अनुष्का गोरख साळुंखे हिने ८९.४० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर संतोषकुमार रामनरेश यादव याने ८१.६० टक्के गुण मिळवून द्वीतिय क्रमांक पटकावला.सलग चौथ्या वर्षी नॅशनल पब्लिक स्कुल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.

मुख्याध्यापक सौ.अंजुम फिरदौस पटेल, संस्थापक अॅड. तारिक अन्वर पटेल,सर्व संचालक,शिक्षक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यांक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब,सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात,असे संस्थापक अॅड. पटेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading