वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचित आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
पुणे : वडार समाजाच्या विविध प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी जातिचा दाखल्यासाठी आसणारी जाचक अट रद्द करावी ,वडार समाजातील तरूणांना बिनव्याजी कर्ज द्यावे ,वडार समाज ज्या जागेवर पिढ्यांन पिढ्या राहतो ती जागा कायदेशीर त्यांच्या नावावर करण्यात यावी ,वडार समाजाच्या सामाजिक व आर्थिक अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा या व अशा अनेक वडार समाजाच्या मागण्यासाठी
वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्तवात आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे तीव्र निदर्शने करुन आंदोलन करण्यात आले .
यावेळी अनिल जाधव यांनी आठ दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीतर आझाद मैदान मुंबई येथे हजोरांच्या संख्येने मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी मोठ्या प्रमाणात वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.या आंदोलनात परेश सिरसिंगे ,अनिल कुऱ्हाडे ,श्यामराव विटकर ,सागर ओरसे,बाळासाहेब दांडेकर ,यासह पुणे शहरातील महिला ,युवक व कार्यक्रते मोठ्या संख्येंने सहभागी होते.
