fbpx

जिल्हा रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही-आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण


पुणे – जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालय पुणेतर्फे सादर करण्यात आलेला नाही आणि तसा कोणताही निर्णय झालेला नाही असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केले आहे.

मागील काही दिवसात माध्यमाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत काही चुकीच्या बातम्या देण्यात येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांच्यावतीने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ कार्यालयाकडे प्राप्त झालेला नाही. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडून वरीष्ठ कार्यालयास सादर केलेला नाही किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव उपसंचालक कार्यालयास प्राप्त झालेला नाही. रुग्णालयाच्या खाजगीकरणाबाबत कुठलाही शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही. सदरच्या वृत्तात कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही डॉ.पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: