सोनू सूद च्या ‘फतेह’ साठी चाहते उत्सुक !
‘फतेह’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे चित्रीकरण हा एक चर्चेचा विषय ठरला असून चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. अलीकडेच सोनू चा एक व्हिडिओ आउट झाला असून त्यातून एक अनोखी झलक बघायला मिळाली आणि यामुळे आता सगळेच सोनू च्या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
शूटिंग शेड्यूल मधून वेळ काढून अभिनेता त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी खास वेळ देतो. ‘फतेह’ मध्ये प्रमुख भूमिका साकारत असलेल्या सोनू सूदने त्याच्या चाहत्यांना दीर्घकाळ वाट बघायला लावली असून आता या चित्रपटाच्या शूट ची एक झलक सगळ्यांना बघायला मिळते.
सिनेमाचा अनुभव आणखी जिवंत करण्यासाठी सोनू सूदने एका खास टीमच्या मदतीने वैयक्तिकरित्या धाडसी स्टंट करण्याची जवाबदारी स्वीकारली आहे. ही बांधिलकी चित्रपटातील महत्त्वाकांक्षी अॅक्शन सीक्वेन्ससाठी त्याच्या अतूट समर्पणाचे उदाहरण देते.
‘फतेह’ हा सोनू सूदचे झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने बनवलेले होम प्रोडक्शन आहे, ज्यामध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य कलाकार दिसणार आहेत.