fbpx

उबरने केली ‘उबर ग्रीन’च्या शुभारंभाची घोषणा

भारतात राईड शेअरिंगला चालना देण्यासाठी उबरने उचलले ईव्ही भागीदारींचे महत्त्वाकांक्षी पाऊल

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील राईड शेअरिंग ऍप उबरने भारतात आपल्या सेवांच्या विद्युतीकरणासाठी विशेष भागीदारी करून या उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत हातमिळवणी करून पर्यावरणपूरक, शाश्वत मोबिलिटीच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलल्याची घोषणा केली आहे. पर्यावरणपूरकतेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोबिलिटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने जून २०२३पासून दिल्ली, मुंबई आणि बंगलोर या शहरांमध्ये ‘उबर ग्रीन’ सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. उबर ग्रीनमुळे प्रवाशांना नेहमीच्या जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या कारऐवजी पूर्णपणे इलेक्ट्रिक, उत्सर्जन अजिबात न करणारे वाहन बोलावता येईल. ऍपवर फक्त काही टॅप्स करून आपल्या आवश्यकतेप्रमाणे ईव्ही वाहनातून प्रवास करण्याचा अनुभव भारतीयांना मिळणार आहे. शून्य किंवा कमी उत्सर्जन असलेल्या राईड्स करण्यासाठी संपूर्ण जगभरात सर्वात जास्त उपलब्ध असलेली ऑन-डिमांड मोबिलिटी सुविधा उबर ग्रीन आहे. जगभरात १५ देशांमधील १०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

उबरचे मोबिलिटी आणि बिझनेस ऑपरेशन्सचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सांगितले, “भारताचा प्रचंड मोठा विस्तार आणि याठिकाणी मोबिलिटीच्या विद्युतीकरणाला  भरभरून मिळत असलेला प्रतिसाद यामुळेच २०४० सालापर्यंत आमच्या प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक राईडचे विद्युतीकरण झालेले असेल हे आमचे वचन पूर्ण करण्याच्या वाटचालीत आम्ही भारताला प्राधान्य देत आहोत. आज उबर ग्रीन लॉन्च करून आम्ही त्या उद्दिष्टाच्या दिशेने खूप मोठे पाऊल उचलत आहोत. आम्हाला ठाऊक आहे की आमचा प्रभाव तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही. वातावरणातील बदल आणि प्रदूषण या समस्यांविरोधात दिल्या जात असलेल्या लढ्यामध्ये आम्ही पर्यावरणपूरक मोबिलिटीच्या माध्यमातून शहरे व सरकारची साथ देऊ इच्छितो.”

उबर ग्रीन लॉन्च करण्याबरोबरीनेच उबरने ईव्हीना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद कायम राखला जावा यासाठी नवीन भागीदारींची घोषणा केली आहे:

फ्लीट पार्टनर्सचा विस्तार: आपल्या प्लॅटफॉर्मवर ईव्ही संख्येत वाढ करण्यासाठी उबर आपल्या फ्लीट पार्टनर्सच्या नेटवर्कमध्ये विस्तार करत आहे. भारतातील सर्वात मोठे बी२बी फ्लीट सर्व्हिस पुरवठादार लिथियम अर्बन टेक्नॉलॉजीज, एव्हरेस्ट फ्लीट प्रायव्हेट लिमिटेड आणि उबरचे जागतिक पातळीवरील फ्लीट पार्टनर मूव्ह उबरच्या सर्वात आघाडीच्या सात शहरांमध्ये २५००० इलेक्ट्रिक वाहने तैनात करतील ज्यामुळे ड्रायव्हर्सना लवकरात लवकर इलेक्ट्रिक होण्यात मदत मिळेल.

ईव्ही दुचाकींसाठी भागीदारी: तंत्रज्ञान सक्षम ईव्ही-ऍज-अ-सर्व्हिस स्टार्टअप झिप इलेक्ट्रिकसोबत उबर हातमिळवणी करत आहे, त्यामार्फत उबरच्या वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या उबर मोटो विभागात पर्यावरणपूरक मोबिलिटीला चालना देण्यासाठी २०२४ पर्यंत १०,००० इलेक्ट्रिक दुचाकी तैनात केल्या जातील. दिल्लीमध्ये उबर मोटोवर १,००० पेक्षा जास्त झिप इलेक्ट्रिक दुचाकी आधीच तैनात करण्यात आल्या आहेत.

ईव्ही फायनान्सिंग: उबर आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांच्यात एका समझोता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ईव्ही आणि सीएनजी या अधिक शुद्ध इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीला साहाय्य पुरवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.  या भागीदारीमुळे जवळपास १००० कोटी रुपयांची, परवडण्याजोगी कर्जे पुरवण्यात मदत मिळेल, भरपूर उत्सर्जन करणाऱ्या वाहनांऐवजी शून्य किंवा कमी उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा वापर करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मदत होईल.

ईव्ही चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा: चार्जिंगसाठीच्या पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात उबर दोन महत्त्वपूर्ण भागीदारी करत आहे. बीपी पल्ससोबतचा जागतिक पातळीवरील मोबिलिटी करार जिओ-बीपीमार्फत भारतात आणला जात आहे.  या भागीदारीमुळे उबर प्लॅटफॉर्मवरील ड्रायव्हर्सना त्यांच्या चार्जिंग नेटवर्क्सचा लाभ मिळवता येईल आणि चार्जिंगच्या नवीन पायाभूत सोयीसुविधांच्या विकासात मदत मिळेल. उबरने चार्जिंग सुविधा निर्माण करण्यासाठी जीएमआर ग्रीन एनर्जीसोबत देखील समझोता करार केला आहे.

उबरचे भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष श्री. प्रभजीत सिंग यांनी सांगितले, “सर्वच्या सर्व वाहने इलेक्ट्रिक असणे हे आव्हान उबरपेक्षा देखील मोठे आहे. आम्ही एकटे हे करू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी ईव्ही परिवर्तनाचे आर्थिक ओझे ड्रायव्हर्सवर पडायला नको. उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या भागीदारी करून आम्ही आमच्या वचनबद्धतेला अनुसरून पावले उचलून ड्रायव्हर्सना अधिक वेगाने इलेक्ट्रिक होण्यात आणि भारताच्या राईड शेअरिंग उद्योगांमधील पर्यावरणपूरक परिवर्तनाला चालना देण्यात मदत करत आहोत.”

 युरोप व उत्तर अमेरिकेमध्ये २०३० आणि संपूर्ण जगभरात २०४० सालापर्यंत शून्य उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनण्याची वचनबद्धता उबरने स्वीकारली आहे. पर्यावरणपूरकतेच्या दृष्टिकोनातून उबरने आपल्या प्लॅटफॉर्मवरील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या तिपटीपेक्षा जास्त प्रमाणात वाढवली आहे आणि २०२२ मध्ये ३१ मिलियन रायडर्सना इलेक्ट्रिक वाहनांमधून प्रवास घडवला आहे. सायन्स बेस्ड टार्गेट्स इनिशिएटिव्हने देखील उबरच्या लघु व दीर्घकालीन, विज्ञानावर आधारित उत्सर्जनातील घट करण्याच्या उद्दिष्टांना मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे उद्दिष्टांना मंजुरी मिळालेल्या पहिल्या ३० यूएस-स्थित कंपन्यांमध्ये उबरचा समावेश झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: