fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

फिनोलेक्स इंडस्ट्रीजने संपूर्ण वर्षभरात चांगल्या मागणीमुळे विक्रमी वॉल्युम-वाढ नोंदविली

मुंबई : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE:FINPIPE|BSE:500940) ने आज झालेल्या त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले.

प्रमुख आर्थिक मुद्दे (स्टँड अलोन):(भारतीय रुपया-कोटी)

Rs. In Crores Q4 FY23 Q4 FY22 % Change FY23 FY22 % Change
Total Income from operations 1,141.06 1,594.57 -28.44% 4,397.05 4,647.32 -5.39%
EBITDA gain/(loss) 217.43 264.66 -17.85% 292.54 1023.74 -71.42%
EBITDA % 19.06% 16.60%   6.65% 22.03%  
Depreciation 23.80 21.55 89.20 83.40
Profit/ (loss) before interest & tax 193.63 243.11 -20.35% 203.34 940.34 -78.38%
EBIT % 16.97% 15.25%   4.62% 20.23%  
Finance costs 6.46 8.06 27.23 14.09
Other Income 29.20 24.76 121.38 83.16
Profit/(loss) before tax excluding exceptional item gain 216.37 259.81 297.49 1009.41 -70.53%
PBT% 18.96% 16.29% 6.77% 21.72%
Exceptional item gain                – 376.06                – 376.06
Profit/(loss) before tax including exceptional item gain 216.37 635.87 -65.97% 297.49 1,385.47 -78.53%
PBT % 18.96% 39.88%   6.77% 29.81%  
Tax 58.02 142.07 60.9 332
Profit/(loss) after tax 158.35 493.80 -67.93% 236.58 1053.47 -77.54%
PAT % 13.88% 30.97%   5.38% 22.67%  
Sales in MT  
PVC Resin (External) 3,322 23,701 -85.98% 26,898 57,095 -52.89%
PVC Resin (Including inter Segment) 58,132 79,182 -26.58% 2,39,638 2,24,924 6.54%
Pipes and Fittings 81,452 78,629 3.59% 3,03,026 2,36,895 27.92%

आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीचे ठळक मुद्दे :

  • आर्थिक वर्ष-२३ च्या चौथ्या तिमाही मध्ये ऑपरेशन्समधून एकूण रु. १,१४१.०६ कोटी एवढे उत्पन्न मिळाले, जे आर्थिक वर्ष-२२ च्या चौथ्या तिमाहीपेक्षा २८.४४% नी कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये रु. १,५९४.५७ कोटी एवढे उत्पन्न मिळाले होते.
  • आर्थिक वर्ष-२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये पाईप आणि फिटिंग्ज विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष-२२ च्या चौथ्या तिमाहीपेक्षा ३.५९% नी वाढून ८१,४५२ एमटी वर गेले. आर्थिक वर्ष-२२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ते ७८,६२९ एमटी एवढे होते.
  • आर्थिक वर्ष-२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये पीव्हीसी विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष-२२ च्या चौथ्या तिमाहीपेक्षा २६.५८% नी कमी होऊन ५८,१३२ एमटीवर आले. आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ते ७९,१८२एमटी एवढे होते.
  • आर्थिक वर्ष-२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ईबीआयटीडीए मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत (वाय ओ वाय) १७.८५% नी कमी होऊन ते रु. २१७.४३ कोटीएवढे झाले. आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ते रु.२६४.६६ कोटी होते.
  • आर्थिक वर्ष-२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये कर आदी सर्व निधी कापल्यानंतरचा नफा (Profit after Tax) रु १५८.३५ कोटी होता. जो आर्थिक वर्ष-२२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये रु. ४९३.८० कोटी एवढा होता.

आर्थिक वर्ष २३ चे ठळक मुद्दे:

  • आर्थिक वर्ष-२३ मध्ये ऑपरेशन्समधून एकूण रु. ४३९७.०५ कोटी एवढे उत्पन्न मिळाले, जे आर्थिक वर्ष-२२ पेक्षा ५.३९% नी कमी झाले आहे. आर्थिक वर्ष-२२ मध्ये रु. ४,६४७.३२ कोटी एवढे उत्पन्न मिळाले होते.
  • आर्थिक वर्ष-२३ मध्ये पाईप आणि फिटिंग्ज विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष-२२ पेक्षा २७.९२% नी वाढून ३,०३,०२६ एमटी वर गेले. आर्थिक वर्ष-२२मध्ये ते २,३६,८९५ एमटी एवढे होते.
  • आर्थिक वर्ष-२३ मध्ये रेजीन विभागातील व्हॉल्यूम आर्थिक वर्ष-२२ पेक्षा ६.५४% नी वाढून २,३९,६३८ एमटी झाले. आर्थिक वर्ष-२२ मध्ये ते २,२४,९२४ एमटी एवढे होते.
  • आर्थिक वर्ष-२३ मध्ये ईबीआयटीडीए मागील वर्षाच्या तुलनेत ७१.४२% नी कमी होऊन ते रु.२९२.५४ कोटीएवढे झाले. आर्थिक वर्ष-२२ मध्ये ते रु.१,०२३.७४ कोटी होते.
  • आर्थिक वर्ष-२३ मध्ये कर आदी सर्व निधी कापल्यानंतरचा नफा (Profit after Tax) मागील वर्षाच्या तुलनेत ७७.५४% नी कमी होऊन रु. २३६.५८ कोटी एवढा झाला. आर्थिक वर्ष-२२ मध्ये तो रु. १,०५३.४७% कोटी एवढा होता.

या तिमाहीच्या परिणामांबाबत बोलताना फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी चेअरमन प्रकाश पी. छाबरिया म्हणाले, “गेल्या तीन वर्षात घटलेल्या व्हॉल्यूमच्या वाढीनंतर किमती स्थिर झाल्यामुळे मागणीमध्ये जोमाने वाढ झाली आहे. देशातील ग्रामीण आणि बांधकाम क्षेत्रातील एकूण वाढीच्या शक्यतांमुळे ही गती दीर्घकाळ टिकून राहण्याची अपेक्षा आहे. कंपनीने पूर्ण वर्षाच्या आधारावर विक्रमी अशी सेल्स वॉल्यूम वाढ मिळवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठत मजबूत आर्थिक कामगिरी पाहिली आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading