fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

औंध, बोपोडी येथील ८०० नागरिकांचे पंतप्रधान मोदींना पत्र

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक जनकल्याणकारी योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध,औंध रोड, चिखलवाडी, बोपोडी येथील नागरिकांनी आभार मानले आहेत. पंतप्रधानांचे आभार मानणारे ८०० हून अधिक नागरिकांचे पत्र आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे सुपूर्त केले.

यावेळी मा. नगरसेवक प्रकाश ढोरे , बुद्धभूषण मंडळाचे अध्यक्ष – शशीकांत भालेराव, सचिव – सुभाष गजरमल, संकेत कांबळे, अक्षय राठोड, आशिष आडसूळ, जितेंद्र गायकवाड, नित्यानंद, सुनील दैठणकर, संतोष भिसे, अनिल माने, प्रतिक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार सातत्याने करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना बिनव्याजी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण, बेटी बचाव-बेटी पढाओ, सुकन्या योजना, अटल पेंशन योजना, यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात. देशातील नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. याबद्दल अनेक नागरिकांना पंतप्रधांनांना धन्यवाद द्यायचे होते. म्हणूनच ‘धन्यवाद मोदीजी’ हे अभियान देशाबरोबर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. पुणे शहरातील नागरिक ही उस्त्फुर्तपणे मोदिजींना पत्र लिहित आहेत. याच अनुषंगाने औंध, औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील नागरिकांनी पत्रे लिहून सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिली आहेत. ही पत्रे शहरातील पत्रांसोबत एकत्रितरित्या मोदिजींना पाठवण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, देशातील नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने मोदिजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून येथील नागरिकांसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे शिबीर आयोजित करून १२०० हून अधिक नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ कार्डचे वाटप केले. केंद्र सरकार मार्फत शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याचप्रमाणे कोविड प्रतिबंधात्मक लस जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच ई -श्रम कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे फॉर्म माझ्या जनसंपर्क कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने भरून देऊन जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी यासाठी प्रयत्न केले. मोदिजींनी केलेल्या या कार्याची पोहचपावती म्हणून औंध,औंध रोड, बोपोडी, चिखलवाडी येथील ८०० हून अधिक नागरिकांनी मोदिजीना धन्यवाद मोदिजी म्हणून पत्र लिहिली आहेत. आज आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना ही पत्र सुपूर्त केली आहेत. लवकरच शहरातून एकत्रित रित्या ही पत्रे मा. पंतप्रधानांना पाठवण्यात येतील, असे सांगत यापुढेही समाजातील प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: