fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

आयटी कंपन्या व कर्मचाऱ्यांमध्ये “नैतिक मूनलाइटिंगवर” परिसंवाद

 

पुणे – सर्वसामान्य समजुती विरुद्ध अनेक आयटी कंपन्या “नैतिक मूनलाइटिंगला” परवानगी देण्यास तयार आहेत. काही कंपन्यांमध्ये मूनलाइटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. दूरस्थ कर्मचारी आणि कंपन्यांमधील संबंध ताणले जात आहेत. कोणत्याही प्रकारच्या मूनलाइटिंगला नैतिक म्हणता येईल का? याविषयी संशयाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रेझूमेक्स या कंपनीने एक सर्वेक्षण केले होते यामध्ये मोठा बदल दिसून आला आहे. त्या अनुषंगाने “नैतिक मूनलाइटिंग” या विषयावर २६ मे रोजी, जे डब्लू मेरियटमध्ये याविषयी परिसंवाद आयोजित केला आहे. कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना या विषयावर मत प्रदर्शनाची ही एक संधी आहे.

जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नेहमीच्या नोकरीव्यतिरिक्त दुसर्‍या कंपनीसाठी किंवा प्रकल्पासाठी काम करतो तेव्हा त्याला तांत्रिकदृष्ट्या ‘मूनलाइटिंग’ म्हणतात.

एप्रिल महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात, रेझूमेक्सने ६० आयटी कंपन्यांमधील उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि एका सर्वेक्षणात विचारले की ते कंपनीच्या बाहेर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या काही ठराविक प्रकारच्या मूनलाइटिंगला माफ करून किंवा प्रोत्साहन देऊन नैतिकतेचा दर्जा देतील का? या सर्वेक्षणाचा निकाल आश्चर्यकारक होता.

संगीत, फोटोग्राफी किंवा नृत्य आदी सर्जनशील व्यवसायामधून अतिरिक्त पैसे मिळविण्यास ७१% कंपन्या प्रोत्साहन देण्यास तयार आहेत. तर २२% कंपन्या कानाडोळा करण्यास तयार आहेत. प्रशिक्षण देणे किंवा कॉन्फरन्समध्ये बोलणे यासारख्या करियर उभारणीच्या कामांनाही ६०% कंपन्या प्रोत्साहन देण्यास तर १५% कंपन्या माफ करण्यास तयार आहेत.

सर्वात आश्चर्यकारक म्हणजे ४०% कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यास स्वतःचा स्टार्टअप काढण्यासही केवळ अनुमतीच नाही तर प्रोत्साहन देण्यास तयार आहेत. कदाचित या कंपन्यांमधील आयटी उद्योजकांनी स्वतः याच मार्गानी पूर्वी गेल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असेल.

या सर्वेक्षणानंतर रेझूमेक्सने काही मोठ्या कंपन्यांमधील धोरणांचा अनौपचारिक आढावा घेतला. बहुतांश कंपन्या पूर्व संमतीने केलेल्या ठराविक प्रकारच्या मूनलाइटिंगला परवानगी देतील. यासर्वात एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, नैतिक मूनलाइटिंग म्हणजे कशा प्रकारचे काम आणि अनैतिक मूनलाइटिंग म्हणजे कोणते?

सर्वेक्षणाचा अहवाल https://rezoomex.com/surveyreport येथे डाउनलोड करता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: