‘स्वदेशी’ शाश्वत विमान इंधनाचा वापर करत पुणे- दिल्ली उड्डाण यशस्वी
पुणे: हवाई वाहतूक क्षेत्रातील कार्बन निस्सारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करताना, स्वदेशी उत्पादित शाश्वत विमान इंधना (एसएएफ) चे मिश्रण वापरून भारतातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाण आज सकाळी यशस्वीरित्या पार पडले. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (प्राज)च्या भागीदारीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे पुरवलेल्या शाश्वत विमान इंधन (एसएएफ) मिश्रित एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) द्वारे संचालित एअर एशियाच्या १५ ७६७ या विमानाने आज पुण्याहून दिल्लीला उड्डाण केले. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली विमानतळावर या विशेष विमानाचे स्वागत केले.
हे उड्डाण शाश्वत विमान वाहतुकीच्या दिशेने देशाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या मार्गदर्शनासह एअर इंडिया समूह, आयओसीएल आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते तसेच विमानचालनाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी स्वदेशी उपाय विकसित आणि प्रसारित करणे आणि भारतात SAF चा व्यापकपणे अवलंब करण्याचा मार्ग मोकळा करते. देशाच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने, प्राज इंडस्ट्रीजने बंदिस्त captive कृषी कच्चा माल वापरून स्वदेशी एसएSAF ची निर्मिती केली आहे.
प्राजने, अमेरिका स्थित जिव्हो आय.एन.सी. यांच्या सहकार्याने जैव कच्चा माल वापरून SAF च्या उत्पादनासाठी ASTM मान्यताप्राप्त अल्कोहोल-टू-जेट (ATJ) वर आधारित एक यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे. IS 17081 एव्हिएशन टर्बाइन इंधन मानकांचे अनुपालन करण्यासाठी स्वदेशी उत्पादित SAF च्या इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळांमध्ये कठोर चाचण्या घेण्यात आल्या.
२०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने दमदार वाटचाल करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून श्री पुरी पुढे म्हणाले., “या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होताना आणि स्वदेशी SAF मिश्रित ATF द्वारे इंधन भरलेले पहिले व्यावसायिक उड्डाणाचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. प्रात्यक्षिक म्हणून १% पर्यंत SAF मिश्रित केलेले हे पहिले देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी उड्डाण असेल. २०२५ पर्यंत, जर आम्ही जेट इंधनामध्ये १% SAF मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले, तर भारताला वर्षाला सुमारे १४ कोटी लिटर SAF ची आवश्यकता भासेल. अधिक महत्त्वाकांक्षीपणे, जर आपण ५% SAF मिश्रणाचे लक्ष्य ठेवले, तर भारताला सुमारे ७० कोटी लिटर SAF ची आवश्यकता भासेल.”
इंडियनऑईल, एअरएशिया इंडिया आणि प्राज इंडस्ट्रीज या आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांचे अभिनंदन करून श्री पुरी यांनी माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला आणि विमानचालनाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी स्वदेशी उपाय विकसित भारतात SAF चा व्यापक अवलंब करण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी आपले विचार मांडताना प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, ” स्वदेशात उत्पादित केलेले SAF वापरून हवाई उड्डाण करण्याची क्षमता दाखवणे हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. ऊर्जा स्वातंत्र्य आणि हरित वाढीच्या दिशेने भारताच्या प्रवासात अन्नदाता ते उर्जादाता या मार्गाने शेतकरी वर्गाच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या दृष्टीने हे आणखी उत्तम उदाहरण आहे. इंडियन ऑइल सोबतच्या आमच्या चालू असलेल्या भागीदारीची आम्हाला जाण आहे आणि आम्हाला आनंद होत आहे की, या निमित्ताने AirAsia उद्याच्या स्वच्छ, कर्बमुक्त आकाशाच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासात आमच्यासोबत सामील झाली आहे.”
एअरएशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री अलोक सिंग या उपक्रमाविषयी म्हणाले,” एअरएशिया इंडियाने इंडियन ऑइल आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने शाश्वत विमान इंधनाच्या मिश्रणाचा वापर करून पहिले व्यावसायिक उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले आहे, हे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो. टाटा समूहाचा भाग आणि एअर इंडियाची उपकंपनी म्हणून, आम्ही पर्यावरणावरील कर्ब प्रभाव कमी करण्यासाठी नावीन्यपूर्ण सहकार्यासाठी वचनबद्ध आहोत. हे उड्डाण भारतीय हवाई वाहतुकीतील अधिक शाश्वत भविष्यासाठी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. आम्हाला आशा आहे की या उपक्रमामुळे स्वदेशी शाश्वत विमान इंधनाचा अवलंब करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल. आमच्या संस्थेच्या डीएनएमध्ये शाश्वतता खोलवर रुजलेली आहे आणि आम्ही अधिक शाश्वत उपक्रमांच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्री. वैद्य म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणून, इंडियन ऑईल तेल आणि वायू क्षेत्रातील बदलांचे नेतृत्व करण्यासाठी आणि स्वच्छ व हरित भवितव्यासाठी वचनबद्ध आहे.” ते पुढे म्हणाले “माननीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टीशी सुसंगत २०४६ पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन मोहिमेसाठी इंडियन ऑइल कटिबद्ध आहे. MoP&NG अंतर्गत आम्ही आज या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की SAF लवकरच विमान वाहतूक उद्योगात अपवादात्मक गोष्ट न राहता सर्वसामान्य प्रमाण होईल.”
सध्या एकूण जागतिक हरितगृह वायू (GHG) उत्सर्जनामध्ये जागतिक हवाई वाहतूकीचा अंदाजे ३% इतका वाटा आहे. आत्ता याकडे दुर्लक्ष केल्यास तो २०५० मध्ये २२% पर्यंत जाईल. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) ने कार्बन ऑफसेटिंग आणि रिडक्शन स्कीम फॉर इंटरनॅशनल एव्हिएशन (CORSIA) चे नियम जारी केले आहेत ज्यात २०५० पर्यंत हवाई क्षेत्रातून कार्बन उत्सर्जन ५०% ने कमी करण्याचे लक्ष्य (उद्दिष्ट ठेवले आहे.) परिभाषित केले आहे. जीवाश्म इंधनाच्या सध्याच्या वापराचा पर्याय म्हणजे SAF वापरणे ज्यामुळे हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी होऊ शकते.