fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उपेक्षित समाजाने एकसंध रहाणे ही काळाची गरज – शरद पवार

पुणे : उपेक्षित मातंग समाजाने आता एकसंध राहिले पाहिजे ,महापुरुषांची नावे घेऊन आताच्या तरूण पिढीला काही लोक वेगळा आणि चुकीचा रस्ता दाखवित आहेत अशा वेळी समाजाने एकसंध राहून समजाचा विकास आणि अन्याया बाबत लढले पाहिजे त्यासाठी मी सदैव आपल्या सोबत राहणार असल्याचा विस्वास राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यव्यापी महाअधीवेशनाच्या उद्गाटन प्रसंगी व्यक्त केला .
पुढे ते म्हणाले की ,क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे . त्यांचा विचार आणि कार्य आज तरुणांनी आत्मसात केले पाहिजे .असे सांगून त्यांनी मानगाव परिषद तसेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक संधर्भ आपल्या भाषणातून दिले .
यावेळी शरद पवार यांचा घोंगडी , पगडी व लहुजी वस्ताद साळवे याचा दांडपट्टा देउन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वगताध्यक्ष डेमॉक्रोटिक पार्टीचे प्रदेशाद्यक्ष अजिक्य भैया चांदणे यांनी मातंग समाजाचे अनेक प्रश्न सांगून या अधिवेशन आयोजनामागील भूमिका सांगितली .
पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले की , देशात परिवर्तन करावयाचे असल्यास बहुजन समाजाने आज शरद पवार यांच्या मागे उभे राहून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे म्हणाले
डेमोक्रॉटिक पार्टी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.सुकुमार कांबळे यांनी मातंग समाजाला स्वातंत्य आरक्षण अबकड प्रमाणे मिळावे ,लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तसेच समाजाच्या विविध अडचणी व प्रश्न शरद पवार यांच्यासमोर मांडले .
या अधिवेशनास डेमोक्रिटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष
प्रा.सूकुमार कांबळे , प्रदेशादयक्ष अजिंक्य चांदणे ,राष्ट्रवादी शहराद्यक्ष प्रशांत जगताप , पद्मश्री लक्ष्मण माने ,अनिल हतागले , सोहम लोंढे ,नंदकुमार नांगरे,संदीप ठोंबरे ,अशोक वायदंडे ,सुभाष लोणके,रमेश चांदणे यासह राज्यातील पार्टीचे प्रमुख पदाधिकारी ,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: