fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsTECHNOLOGY

सोनीच्या WF-LS900N चा नवा रंग “अर्थ ब्ल्यू” जो पाण्याच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आला आहे

नवी दिल्ली : सोनीने आज घोषणा केली की, त्यांचे हे बाहेरील आवाज पूर्णपणे बंद करणारे, खऱ्या अर्थाने वायरलेस इयरबड्स WF-LS900N आता “अर्थ ब्ल्यू” या नव्या रंगात सादर केले जाणार आहेत. नोव्हेंबर २०२२ पासून बाजारपेठेत असलेले हे इयरबड्स आतापर्यंत सफेद, काळ्या रंगात उपलब्ध होते. “अर्थ ब्ल्यू” हा नवा रंग रिसायकल करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या मटेरियलपासून तयार करण्यात आला आहे. मल्टीपॉईंट कनेक्शन देखील रिलीज करण्यात असून त्यामुळे एका सॉफ्टवेयर अपडेटमार्फत WF-LS900N सिरीजमध्ये अखंडित स्विचिंग करणे शक्य झाले आहे.

WF-LS900N आता “अर्थ ब्ल्यू” रंगामध्ये उपलब्ध असणार आहे, हा रंग रिसायकल करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेले रिसायकल्ड रेसिन मटेरियल वापरून तयार करण्यात आला आहे. अर्थ ब्ल्यू रंगामध्ये WF-LS900N च्या बॉडी व केसचे भाग हे रिसायकल करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या मटेरियलपासून तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे यावर अनोखे मार्बल पॅटर्न तयार झाले आहे. पाणी वाहून नेण्याच्या कामी वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांच्या रिसायकल्ड मटेरियलचा संभाव्य वापर अजून जास्त वाढावा यासाठी नवे डिझाईन तयार करण्यासाठी सोनीने हा रंग विकसित केला होता.

हे मटेरियल अतिशय अनोख्या पद्धतीने फक्त या उत्पादनासाठी विकसित करण्यात आले आहे.  पाणी वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांच्या मटेरियलच्या चिकटपणा या गुणधर्माचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. त्यानंतर मार्बल पॅटर्नचे टेक्श्चर तयार करण्यात आले, वेगळी पॅटर्न असावी यादृष्टीने प्रत्येक उत्पादन डिझाईन करण्यात आले आहे.

“अर्थ ब्ल्यू” मॉडेलव्यतिरिक्त WF-LS900 या इयरबड्सचे संपूर्ण पॅकेजिंग प्लास्टिकविरहित असून या इयरबड्समध्ये ऑटोमोबाईल पार्ट्समधील रिसायकल्ड मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.  आपल्या उत्पादनांचा पर्यावरणावर होणारा  परिणाम कमी व्हावा ही सोनीची बांधिलकी यामधून दिसून येते.

सोनी उद्योगसमूह “रोड टू झिरो” ही दीर्घकालीन पर्यावरण योजना राबवत आहे. २०५० सालापर्यंत आपले पर्यावरणात्मक फूटप्रिंट शून्य असावे हा सोनीचा यामागचा उद्देश आहे. याअंतर्गत सोनीने “ग्रीन मॅनेजमेंट २०२५” ही मध्यम कालावधीची पर्यावरणात्मक उद्दिष्ट्ये ठरवली आहेत जी आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष २०२५ या कालावधीत पूर्ण केली जातील. रिसायकल्ड प्लास्टिकचा वापर, उत्पादनांसाठीच्या विजेच्या वापरामध्ये घट, नव्याने डिझाईन करण्यात आलेल्या छोट्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमधून प्लास्टिक वगळणे आणि नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर यासारख्या प्रयत्नांना वेगवान करणे हा यामागचा उद्देश आहे.

मल्टीपॉईंट कनेक्शन फंक्शन उपलब्ध होणार

याशिवाय WF-LS900N ला एक सॉफ्टवेयर अपडेट देखील उपलब्ध होणार असून त्यामुळे मल्टीपॉईंट कनेक्शन फंक्शन सक्षम केले जाणार आहे, यामुळे युजर्सना दोन डिव्हायसेस एकाच वेळी कनेक्ट करता येतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या पीसीवर गाणे ऐकत असाल आणि त्याचवेळी स्मार्टफोनवर फोन कॉल आला तर मल्टीपॉईंट कनेक्शन स्मार्टफोन कॉलला आपोआप स्विच करेल आणि तुम्ही कनेक्शन्स स्विच न करता हॅन्ड्स-फ्री कॉल करू शकाल.

उपलब्धता

अर्थ ब्ल्यू रंगामध्ये WF-LS900N हे भारतात फक्त ऍमेझॉनवर १७ मे २०२३ पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: