Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा   

 पिंपरी : पश्चिम ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन व्याख्यान, आरोग्य शिबीर, प्रवचन, सांघिक स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 यावेळी सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, कार्याध्यक्ष बाबुराव फुले, प्रवक्ते अरुण बागडे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रणव राव आदी उपस्थित होते. 

आरती राव यांनी माजी महापौर नानासाहेब शितोळे यांनी पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगत जेष्ठांनी घ्यायची काळजी, आहार याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अच्युत उतेकर यांनी जेष्ठांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचे पसायदान या विषयावर प्रवचन संपन्न झाले. मंदार वैद्य यांनी आर्थिक नियोजन याबाबत सल्ला दिला. समाजप्रबोधनकार शारदाताई मुंढे यांनी आई या विषयावर विचार व्यक्त केले. अशोक देशमुख यांचे जेष्ठांचे आनंदी जीवन यावर भाषण झाले. या सर्व कार्यक्रमांना जेष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष संभाजी मनोकर,  ईश्वरलाल चौधरी, अशोक चव्हाण, चंद्रकांत चोपडे, रमेश काटे, चंद्रभागा कर्डीले, गौरव उदार, शैलजा बागर, अर्जुन फसर्ग, शिवाजी लोखंडे, मंगला चौधरी, शैला अक्का, राजाराम रोकडे, सुदामराव बोंबले व  बिरारीस यांनी केले.
 सूत्रसंचालन स्मिता बर्गे, नीलम मेमाणे व भटू शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading