Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

लहान तोंडी मोठा घास, बच्चेकंपनी कॉमेडी असणार आहे खास !

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली आठ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे ‘होउ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला. या यशस्वी पर्वा नंतर ‘चला हवा येऊ द्या’च विशेष सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं.

आता झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’ ह्या कार्यक्रमाला येणार आहे एक नवीन बहार, कारण लवकरच बच्चे कंपनी आपल्या भेटीस येणार आणि आपल्याला खळखळून नाही तर पोट धरून हसवणार. ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम जशी प्रेक्षकांना आवडते तसेच लहान गोंडस गोड़ कलाकार या मंचावर धुमाकूळ घालतील आणि प्रेक्षकांकडून लाड तर करून घेतीलच शिवाय त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने वाह वा पण मिळवतील. या नवीन पर्वत स्पर्धक म्हणून असतील माझी तुझी रेशीमगाठ फेम ‘मायरा वायकुळ’, नवा गडी नवं राज्य मधील चिंगी अर्थात ‘साईशा भोईर’, अप्पी आमची कलेक्टर मधील छकुली ‘स्वरा पाटील’, तू चाल पुढं मधील ‘रेयांश’, तुझ्यात जीव रंगला मधील लाडू अर्थात ‘राजवीर’ ही बच्चे कंपनी ह्या पर्वात असणार आहेत.

तेव्हा तयार व्हा या खासमखास पर्वासाठी ‘चला हवा येऊ द्या – लहान तोंडी मोठा घास’ १५ मे पासून, सोमवार आणि मंगळवार, रात्री ९:३० वाजता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading