fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsSports

अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा दुसरा विजय

‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा
पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अलंकार पारवे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ४ गडी राखून पराभव केला.

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ११२ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विहान सुतार (४१ धावा), पियुष अल्त्तेकर (२३ धावा) आणि विरेंद्र पी. (२२ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. गोलंदाजीमध्ये अजित वाडेकर संघाच्या अलंकार पारवे (३-२०), युवराज मोरे (३-२५) आणि रणवीर पांगारे (२-१६) यांनी अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी करून ३० यार्डस् संघाचा डाव झटपट गुंडाळला.

हे आव्हान अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २१ षटकामध्ये व ६ गडी गमावून पूर्ण केले. श्रवण व्हावळ (३१ धावा), स्वराज मोरे (२४ धावा) आणि अलंकार पारवे (१६ धावा) यांनी छोट्या आणि महत्वपूर्ण खेळी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३.५ षटकात १० गडी बाद ११२ धावा (विहान सुतार ४१, पियुष अल्त्तेकर २३, विरेंद्र पी. २२, युवराज मोरे ३-२५, अलंकार पारवे ३-२०, रणवीर पांगारे २-१६) पराभूत वि. अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २१ षटकात ६ गडी बाद ११३ धावा (श्रवण व्हावळ ३१, स्वराज मोरे २४, अलंकार पारवे १६, विहान सुतार ३-१८, अर्णव शेगर २-२); सामनावीरः अलंकार पारवे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading