‘लवंगी मिरची’च्या कलाकारांनी दिली ‘घरोबा लंच होम’ला भेट
झी मराठीवरील लोकांना पसंत पडणारी मालिका ‘लवंगी मिरची’ आता १० मे पासून रात्री १० वाजता दाखवली जाणार आहे. या माय लिकेच्या कलाकारांनी नुकतीच लालबाग मधील ‘घरोबा लंच होम’ येथे भेट दिली. जशी मालिकेमध्ये अस्मि, तिची आई राधाक्का आणि तिच्या दोन बहिणी अर्चना आणि मनवा अश्या चौघी जणी मिळून चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध असलेली ‘राधाक्काची खानावळ’ सांभाळत असतात. अश्याच पद्धतीने खरोखर जीवनात असलेल्या लालबाग येथील ‘घरोबा लंच होम’ स्वादिष्ट जेवणासाठी सुप्रसिद्ध आहे. उर्मिला विनायक पडवळ यांचे ‘घरोबा लंच होम’ हे सध्या साठीच्या घरात आहे. रोज असंख्य लोकं त्यांच्या हातचे स्वादिष्ट जेवण जेऊन तृप्त होतात. एक वैशिष्ट म्हणजे ह्या व्यवसायात सुरवाती पासूनच उर्मिला पडवळ ह्यांनी स्त्रियांना आपल्या बरोबरीने घेऊन काम उपलब्ध करून दिले. लवंगी मिरचीच्या टीमने ‘घरोबा लंच होम’ ला भेट देऊन उर्मिला व इतर सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक केले. उर्मिला पडवळ ह्यांनी हि लवंगी मिरच्या टीमला अतिशय स्नेहपूर्वक आशीर्वाद दिले.
