मला या मालिकेत काम करतांना खुप मज्जा येते: स्वरा पाटील
- अप्पी आमची कलेक्टर ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?
ह्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका छान आणि प्रेरणा देणारी आहे, मला मज्जा येते या मालिकेत काम करताना. तुम्ही आता मागील भागात पहिलाच असेल की अप्पी दीदी आता कलेक्टर झाली आहे. तर तिची पी ए म्हणून वावरताना एकदम छान वाटते.
- तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
मी या मालिकेत छकुली नावाची भूमिका साकारत आहे आणि ती अप्पी दीदी ची पी.ए आहे. गावातल्या प्रत्येक गोष्टी तिला माहित आहेत आणि आता अप्पी दीदी कलेक्टर झाल्यामुळे आता गावातील सगळी काम मार्गी लागणार त्यामुळे एकदम भारी वाटतंय.
- तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
मला सर्वांसोबत काम करताना खूप बरं वाटते. सेटवरचं वातावरण सुद्धा सुंदर आहे. सर्व एकमेकांशी मिळून मिसळून राहतात व मला या मालिकेत प्रत्येकाकडून खूप काही शिकायला मिळते.
- तुझ्या आता पर्यंतचा प्रवास ?
ही माझी झी मराठी सोबत दुसरी मालिका आहे. याआधी मी देवमाणूस या मालिकेत काम केलं आहे. अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा आग्रहाने सांगेन की माझ्या कलेक्टर झालेल्या अप्पी ताईला पाहायला विसरू नका ‘अप्पी आमची कलेक्टर’ , सोमवार ते शनिवार संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
