राष्ट्रीय महीला खेळाडू व महीला पत्रकार अत्याचार प्रकरणी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु गप्प का..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
मुंबई : देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महीला राष्ट्रपती विराजमान असुनही, राजधानी दिल्ली मध्ये जंतर-मंतर वर भारतास ॲालिंम्पीक मध्ये पदके मिळवून राष्ट्राचे नाव ऊंचावणाऱ्या, राष्ट्रीय महीला कुस्तीगीर खेळाडुंना भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे विरोधात लैंगिक छळ प्रकरणी दिर्घकाळ सत्त्याग्रह करावा लागतो आहे. या महीला खेळाडुंचे रस्त्यावरील ‘सत्त्याग्रह आंदोलनाचे’ कव्हरेज व त्यांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी तेथे गेलेल्या महीला पत्रकार साक्षी जोशी यांना दिल्ली पोलीसांनी दिलेली वागणूक निषेधार्य व निंदनीय होती. देशाच्या राजधानीत चाललेला हा प्रकार महामहीम महीला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कशा खपवून घेत आहेत..? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोराळदादा तिवारी यांनी उपस्थित केला.. स्वातंत्र्योत्तर लोकशाही रुपी भारताच्या संविधानामुळे देशाची महीला भगीनी राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. मात्र त्यांचे दृष्टीपंथातच ‘महीला खेळाडूंना न्यायासाठी अविरत संघर्ष करावा लागत असेल व महीला पत्रकारच् जर सुरक्षीत नसतील’ तर ‘महामहीम महीला राष्ट्रपतीं’ कडुन देशवासियांनी काय अपेक्षा करावी..(?) असे ऊदीग्न वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!
स्व राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३% आरक्षण देऊन महीलांच्या सबलीकरणा करीता पावले उचलली होती.. मात्र बस हुआ नारी पर अत्याचार म्हणुन सत्तेवर आलेल्या मोदी – शहांच्या सरकार ला महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. राजमाता जिजाऊ, झाँसीची राणी लक्ष्मीबाई, सावित्री बाई फुले, रमाबाई आंबेडकरांचा वारसा असलेल्या भारतात, महीलांवरील अत्याचार जर “महीला राष्ट्रपती” असतांना देखील घडत असतील तर महामहीम राष्ट्रपतींना पदावर रहाणे बाबत (?) नैतिक अधिकार आहे काय (?) याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. असे वाटत नाही काय..? असा परखड सवाल ही महाराष्ट्र काँग्रेसने ऊपस्थित केला आहे..! हिंदुत्वाचे बुरख्या आड ‘बजरंग बली’चे नांवे कर्नाटकात मते मागणारे मोदी सरकार दुसरीकडे मात्र ‘बजरंगाची ऊपासना करणाऱ्या महीला मल्लां’वरील रावणी अत्याचारींना वाचवते… हीच भाजपची खरी ओळख…! अशी पुस्ती देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली..!
