Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा शुक्रवारपासून

पुणे : गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे (District level boxing championship tournament ) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ७ मे दरम्यान होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तेजस जाधव यांनी दिली.

तीन दिवस चालणारी ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर होणार आहे. पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत ४०० हून अधिक बॉक्सर सहभागी होणार आहेत, अशी माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष नीलेश खाणेकर, उपाध्यक्ष डॉ. अमरसिंह भोरे, खजिनदार शैलेश खाणेकर, चिटणीस प्रितम मळेकर, सरचिटणीस यश खाणेकर उपस्थित होते. विजेत्यांना सुवर्ण आणि रौप्यपदक देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वजनी गटात, पुरुष आणि महिला बेस्ट बॉक्सर यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा कुमार, वरिष्ठ पुरुष आणि महिला अशा १३ वजनी गटात होणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ५ मे रोजी दुपारी ४ वाजता भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रमेश बागवे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्पर्धा होणार आहेत. कुणाल टिळक आणि परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. युके बॉक्सिंग अकॅडमी यांचे स्पर्धेला विशेष सहकार्य मिळाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading