काँग्रेस नेहमीच कामगारांसोबत : डॉ. कैलास कदम
पिंपरी : देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनच काँग्रेस पक्ष नेहमीच कामगारांसोबत राहिला आहे. काँग्रेसने शेतकरी आणि कामगारांना अनुकूल धोरणे राबवून देशाचा विकास केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत ३ मे १९४७ रोजी इंटकची या राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, गुलझारी लाल नंदा, लालबहादूर शास्त्री असे मान्यवर उपस्थित होते. देशाचा सर्वांगीण विकास आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याची क्षमता श्रमिकांच्या हातात आहे यामुळे काँग्रेसने नेहमीच कामगारांना अनुकूल ध्येय धोरणे राबवली. आताचे केंद्र आणि राज्य सरकार हे कामगारांचे न्याय हक्क डावलून भांडवलदारांना अनुकूल धोरण राबवीत आहे. याच्या निषेधार्थ आज देशभरातील कामगार हे कामगार दिनाचा आनंद साजरा करत नसून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देऊन निषेध दिन साजरा करीत आहेत असे महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिक फाटा येथे सोमवारी १ मे कामगार दिनानिमित्त निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, पुणे जिल्हा इंटकचे सरचिटणीस मनोहर गडेकर, बँक कर्मचारी संघाचे गिरीश मेंगे, सुनील देसाई, संरक्षण विभागाचे शशिकांत धुमाळ, भालेकर, वैभव वारके, महेश तापकिर, बाळासाहेब गुंड, शब्बीर इनामदार, पीमपीमएल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, सरचिटणीस नसुरुद्दीन इनामदार, प्रदीप पवार, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, गणेश गोरिवले, विकास साखरे, संतोष खेडेकर, गोरख जगताप, हमिद इनामदार, नवनाथ जगताप, मेजर जोगदंड, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, लक्ष्मण रुपनार, निर्मला खैरे, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, उमेश बनसोडे, किरण नढे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, आकाश शिंदे, आण्णा कसबे, सतीश भोसले, पांडुरंग जगताप, गुंगा क्षीरसागर, वसंत वारे आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कामगार संघटना संयुक्त कृती समिती काम करीत आहे. सरकारने कामगार कायदे बदलताना या समितीशी चर्चा केली नाही. हे कायदे रद्द झालेच पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे डॉ. कदम यांनी सांगितले.
