fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमित शहांना सांगतो तुम्हाला जमीन दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातला माणूस राहणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : पवार साहेब बाळासाहेबांचा कलगितुरा चालायचा पण कधीच सूडबुध्दी नवह्ती. बाळासाहेबांनी मनोहर जोशी मुंडेंना सांगितले होते विरोधकांवर अत्याचार करायचा नाही. पालघर मध्ये गरीब आदिवासी लोकांना त्रास सरकार देतय. बारसू, श्रीसेवकांचे तुम्हाला शाप. महाराष्ट्राची बदनामी हिंदुत्व नासवतायत. कदाचित उद्या इथे पण गोमूत्र शिंपडायला येतील आमच हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे ही माझ्या वडिलांची शिकवण. एका राज्यात गोमासावर हत्या करतात तर इतर राज्यात गोमास चालत. मी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलो तर हिंदुत्व सोडले मग भागवत मशिदीत गेलेले कसे चालतात? आता भगवा मविआ सोबत उंच फडकवायचा आहेत. मी अमित शहांना सांगतो तुम्हाला जमीन दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातला माणूस राहणार नाही. असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. 

महाविकास आघाडीच्या आज झालेल्या वज्रमुठ सभेत ठाकरे बोलत होते.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मराठी माणसाच्या बलिदानाला ६३ वर्ष लढवून मिळवलेली ही राजधानी. काल रात्री हुतात्मा स्मारकावर नतमस्तक. काल आम्ही पोहोचलो तेव्हा कुणीही शासकीय कर्मचारी तिथे नव्हता. सगळी सजावट शिवसैनिकांची. मिंधेंना एक सांगायचय बलिदान मराठी माणसाने केले नसते तर तुम्ही गद्दारी करुन का होईना मुख्यमंत्री झाला नसता. मोरारजी सारखा नरराक्षस तेव्हा सत्तेत. मुंबई कशी मिळाली हे विसरलो तर हे मुंबईचा लचका तोडायला बसलेच आहेत. गिरणगावाच्या तेव्हाच्या दुखद आठवणींचा संदर्भ. महिलांचा पराक्रमाची आठवण. खुर्ची मिळाली बुड टेकवायला म्हणून तुम्ही मुंबई महाराष्ट्रावरील अन्याय मिंधे होऊन बघता.

काल पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने मला ९१ शिव्या दिल्या, मी समर्थन करत नाही पण मला आदित्यला कुटुंबाला तुमची लोक जे बोलतात तेव्हा तुम्ही का बोलत नाही? तुमची भोक पडलेली टिनपाट जर बोलणार असतील तर मग आमची लोक पण बोलतील. आता वज्रमूठ आहे. आता पर्यंत सगळ्या निवडणुकीत मविआने त्यांना चित केलय.

बारसू बद्दल मी ६ तारखेला जाऊन भेटून बोलणार. तो माझ्या महाराष्ट्राचा भाग आहे. मी जागा सुचवली होती पण माझ्या पत्रात लोकांवर अत्याचार करा अस लिहिलय? जेव्हा मविआ होती तेव्हा माझ्यावर टीका झाली मी पवार साहेंबांच्या दबावाखाली आहे काल परवा उदय सामंत पवार साहेबांना भेटले. तुम्ही केले तर कस चालत. सरकार गेल्या गेल्या या सरकाने पहिल्यांदा बुलेट ट्रेनला दिली. सोन्यासारखी जागा घशात घातली. किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार. मी आरे कारशेडला स्थगिती दिली पर्यावरणासाठी. पण केंद्र सरकार कोर्टात गेले आणि अडवून ठेवले. मी मेट्रोची कारशेड कांजूरला करणार होतो जागेला विरोध होता मेट्रोला नाही. आता कांजूरला पण कारशेड करणार आहे मी हे आधीच सांगितले होते. मग ती अडवली कशाला तर मविआला श्रेय नव्हते मिळू द्यायचे.

मुंबईतून सगळी कार्यालये मुंबई बाहेर नेतायत. भांडवलदारी वृत्ती सगळ ओरबडायचे. जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडेल त्याचे तुकडे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई देशात सर्वाधिक महसूल देणारे शहर ते यांना कापायचे आहे. आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत. मला आभिमान की मविआ काळात मराठी भाषा सक्तीची या सरकारने ती शिथिल केली कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार? पंतप्रधानांना आम्ही मविआ म्हणून गेलो होतो ११ मागण्या त्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून मागणी केली.

बाबरी पडली तेव्हा कसे सगळे पळाले चंद्रकांतदादा म्हणाले. बाळासाहेबांचे पण यांना महत्व कमी करायचे आहे. कर्नाटकात निवडणुका आल्या. लोकांना भुलवण्याचे काम भाजप करते निवडणुक काळात. अच्छे दिन येतील म्हणाले आलेत का? धार्मिक दंगली घडवायच्या. मग तुम्ही आम्ही मुख्य मुद्दे विसरतो. वाटेल ती वचने द्यायची आणि राजकारण साध्य करायचे. बारसूच्या लोकांनी मान्यता दिली तरच रिफायनरी असे आपले धोरण होते.

मी मागणी करतो कोकणात आंब्याचे नुकसान झाले ते मविआ ने भरपाई दिली तशी द्या. आपण पाण्याची गरज भागवण्यासाठी आपण निर्णय घेतला समुद्राचे पाणी वापरता येऊ शकेल तशी सुरुवात आपण केली पण यांनी त्याला स्थगिती दिली. सत्यपाल मलिकांनी गौप्यस्फोट केला. अदानींची चौकशी करूच नका. पण त्यांनी काय काय केले ते अभ्यासक्रमात घ्या आम्ही अडाणी आहोत आम्हाला अदानी व्हायचय. पुलवामात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा झाले. चीन घुसतोय हे शेपट्या घालून बसतायत. गोरगरिबांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा लावता. सत्यपाल मलिक म्हणाले पंतप्रधानांना सांगितले पण मलिकांना चुप बसा म्हणून पंतप्रधान म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading