Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग देशभरात प्रसिद्ध झाला. देशभरात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात मोदींनी ‘मन की बात’चा प्रवास सांगितला. तसेच ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या यशावरही प्रकाश टाकला. (100th episode of Prime Minister Narendra Modi’s ‘Mann Ki Baat’ programme)

मोदी म्हणाले की, देशभरात नारीशक्तीने अनेक अभियान राबविले आहेत. तसेच या महिलांविषयी मोदींनी काम सांगितले. मोदींनी कार्यक्रमात अनेक व्यक्तींशी ‘मन की बात’मधून संवाद साधला. यावेळी त्यांनी पेन्सिल स्लॅटचे काम करणारे काश्मीरचे मंजूर अहमद यांच्याशी संवाद साधला.

मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे मुंबईत आज खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे,

मोदी म्हणाले, ‘मन की बात’ कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे प्रकटीकरण आहे. २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशीपासून ‘मन की बात’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम देशातील चांगल्या गोष्टींचे आणि सकारात्मकतेचे अनोखे पर्व बनला आहे. हा कार्यक्रम दर महिन्याला येतो. या कार्यक्रमाची सर्वांना प्रतीक्षा असते, असेही मोदी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading