Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दि. २६ मार्च, २०२३ रोजी वनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास वनमंत्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते व  चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण,  यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनावणे, विभागप्रमुख प्रा. ए.बी. नदाफ व प्रा. दिगंबर मोकाट यांनी एम. डी. सी. सभागृह, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे स्वीकारला आहेत. प्रा. दिगंबर मोकाट यांच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम व विभागस्तर प्रथम असे दोन पुरस्कार मिळाले आहेत यात रोख रु. एक लाख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, इ. चा समावेश आहे. प्रा. मोकाट यांनी गेल्या दोन दशकात वनस्पती संवर्धन, रोपे निर्मिती, पर्यावरण विषयी जनजागृती, वनस्पती-वने-औषधी वनस्पती विषयांची प्रकाशाने या मध्ये उल्लेखनीय काम केले आहेत.

औषधी वनस्पती विषयाचे त्यांचे कार्य अनमोल आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने दखल घेतली आहेत. या कार्यक्रमावेळी वनविभागातील प्रधान सचिव  बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण डॉ. सुनीता सिंग, महाराष्ट्र राज्य,  अमोल थोरात, विभागीय वन अधिकारी, पुणे व हनुमंत धुमाळ, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे इ. उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाले बद्दल प्रा. दिगंबर मोकाट व विभागाचे अभिनंदन विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading