Tuesday, September 1, 2026
Latest NewsSports

पहिल्या प्रिमियर हॅण्डबॉल लीगचा लिलाव संपन्न

मुंबई  – पहिल्या वहिल्या हॅण्डबॉल लीगसाठी रविवारी मुंबईत मोठ्या उत्साहत लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. दिल्ली पॅन्झर्स, गरवीत गुजरात, गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आयर्नमन, राजस्थान (संघाचे नाव अनिश्चित) आणि तेलुगु टॅलोन्स अशा सहा फ्रॅंचाईजी मालकांनी आपल्या तज्ज्ञांसह लिलावात भाग घेतला. (First Premier Handball League auction concluded)

स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुणवत्तेसह लिलावासाठी ११६ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेला परदेशी खेळाडूंपासून सुरुवात झाली. यामध्ये परदेशातील सर्व १८ खेळाडूंना बोली लागली. प्रत्येक संघाला फक्त एक राईट बॅक, लेफ्ट बॅक आणि गोलरक्षक निवडण्याची परवानगी होती. सरदेशी खेळाडूंमधील सर्वाधिक बोली रशियाचा गोलरक्षक आंद्रेई इगोरेविच नेडबैलो याला लागली. तेलुगु टॅलोन्सने त्याच्यासाठी बोली लावली. गरवीत गुजरातने उझबेकिस्तानच्या तुलिबोएनव मुख्तोर याला पलसंती दिली. गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश संघाने इराणच्या ओमिद रझाला निवडले. त्याचवेळी महाराष्ट्राच्या आयर्नमन संघाने इराणच्याच जलाल कियानी आणि राजस्थान संघाने इराकच्या बदेरलीन नासेरला स्थान दिले.
लिलावातील दुसरी श्रेणी भारतीय स्टार खेळाडूंची होती. यामध्ये ४२ खेळाडूंची निवड करण्यात आली.
या श्रेणीमध्ये प्रत्येक संघाला सात स्थानांपैकी प्रत्येकी एका खेळाडूची निवड करायची होती. प्रमुख बोलींमध्ये तेलुगु टॅलोन्सने रघु कुमारा, गरवीत गुजरातने हरेंद्रसिंग नैन, उत्तर फ्रदेशने भूषण शिंदे, महाराष्ट्राने अंकित कुमार, दिल्लीने मिंटू सरदार, राजस्तानने रॉबिन सिंग यांची खरेदी केली.
लिलावाचा अखेरचा टप्पा भूमिका खेळाडू म्हमून ओळखण्यात आले. यासाठी ५६ खेळाडू लिलावात होते. यातील ४२ खेळाडूंची निवड झाली. तेलुगूने राहुल नैन, गुजरातने सुरेंदर कुमार, उत्तर प्रदेशाने संचित गुप्ता, महाराष्ट्रने मोहित पुनिया, दिल्लीने २० वर्षीय दीपक आणि राजस्थानने मोहित घनघास यांची खरेदी केली.
लिलाव प्रक्रियेबद्दल बोलताना ब्ल्यू स्पोर्ट एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनू अग्रवाल म्हणाले, “हा एक वेगळाच आनंद मिळवून देणारा अनुभव होता. आम्ही अनेक दिवस प्रिमियर हॅण्डबॉल लीगची रचना मजबूत कशी करता येईल, याचा विचार करत आहोत. लिलाव प्रक्रियेने आम्ही यात एक पाऊल आणखी पुढे टाकले. लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व फ्रॅंचाईजी मालकांनी मेहनत घेतली. त्या प्रत्येकाचे आभार. पहिलीच लीग असल्याने फ्रॅंचाईजी मालकांना सर्वोत्तम १७ खेळाडू निवडण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. यामुळेच उद्घाटनाचा हंगाम रोमांचक होईल याची खात्री पटली.”
प्रिमियर हॅण्डबॉल लीगला दक्षिण आशियाई हॅण्डबॉल महासंघ आणि आशियाई हॅण्डबॉल महासंघाची मान्यता आहे. प्रिमियर लीगचा हंगाम ८ जून रोजी सुरु होणार असून, २५ जून पर्यंत चालणार आहे. जीओ सिनेमा, स्पोर्टस १८-१ (एचडी, एसडी) आणि स्पोर्ट्स १८ खेल या वाहिनींर वायकॉम १८च्या माध्यमातून लीगचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading