Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

डॉ. आंबेडकरांच्या शिकवणी शिवाय जर कोणी वेगळा विचार केला, तर त्यांना खूप अवघड जाईल – अभिनेते सयाजी शिंदे

पुणे : कोणताही राजकीय नेता, नट किंवा शास्त्रज्ञ सावली देत नाही किंवा फळ ही देत नाही. त्यामुळे माझ्या मते झाड हा खरा सेलिब्रिटी आहे. झाड आपल्याला मरेपर्यंत ऑक्सिजन देत त्यामुळे आई आणि झाडं यापेक्षा मोठ काहीही नाही. तसेच राजकारणात कितीही पक्ष आले तरी आपण झाडांच्या पक्षावर प्रेम करूया कारण झाडांचा पक्ष टिकणारा आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणी शिवाय जर कोणी वेगळा विचार करत असेल तर, त्यांना पुढे खूप अवघड जाईल, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील उत्तुंग योगदान आणि सामाजिक कार्य लक्षात घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीच्या वतीने ‘समर्पण पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पहिला समर्पण पुरस्कार संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांना  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समितीचे राजेश पांडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, सुनील महाजन, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अलीकडे साहित्यिक, अभिनेते सध्य परीस्थितीवर स्पष्ट मत मांडताना दिसत नाहीत. मात्र सायाजी शिंदे यांनी अप्रत्यक्षरीत्या चालू घडामोडींवर भाष्य करीत आपले मत मांडले. पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, माझ्यातील कलाकाराचा खरा प्रवास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाच सुरू झाला. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा नाईट वॉचमनची नोकरी करायचो. तेव्हा विद्रोही कविता खूप ऐकायला मिळायच्या. नामदेव ढसाळ व दया पवार यांच्या कविता माझ्या तोंडापाठ होत्या. तेव्हा झाडं सुद्धा खूप होती. मात्र आता तीच झाड दिसत  नाहीत. फक्त ओसाड माळरान आणि लांब रस्ते दिसतात. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देवून जाणार? म्हणून आम्ही सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरूवात केली. सध्या औरंगाबाद येथे ६७ जुन्या झाडांच्या पुनःरोपणाचे काम सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading