” चत्रभुज नरसी स्कूल”आता पुण्यातील अमनोरा पार्क टाऊन येथे
पुणे – ज्ञानाने आणि तत्वज्ञानाने सर्वांना प्रकाशित करा’ ‘शिकणे हा आनंदी भावना असावी तसेच शिकवणे ही देखील तितकीच सुखद भावना असावी’ या संकल्पनेसह द नरसी मोंजी कुटुंबाने गेल्या ६० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशाची सेवा केली आहे.
एक दशकांपूर्वी, अमानोरा पार्क टाऊनची ही भारतातील पहिली पूर्ण विकसित आणि एकत्रित टाउनशिप म्हणून विकसीत झाली होती. ४०० एकरच्या परिसरात बांधलेली ही देशातील पहिले स्मार्ट सिटी आहे. चत्रभुज नरसी स्कूल- अमानोरा पार्क टाऊन, पुणे हे ६.५ एकरांच्या जागेत बांधलेले एक विस्तीर्ण कॅम्पस आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या अधिकतम वापरासह ३,२५,००० चौरस फूटांचे बांधकाम आहे.
शाळेच्या ६०००० चौरस फुटांच्या प्लेग्राउंड वर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आहेत, यामध्ये प्रोफेशनल रनिंग ट्रॅक आणि सायंकाळच्या खेळांसाठी उच्च कार्यक्षमतेच्या एलईडी लाईट्ससह मल्टीस्पोर्टसाठी टर्फ, २५ मीटरचा सेमी ऑलिम्पिक नियंत्रीत तापमाच्या सुविधेसह जलतरण तलाव, ३० फूट कॉम्पीटिशन रॉक क्लाइंबिंग वॉल, ४ प्रोफेशनल बॅडमिंटन कोर्ट यांचा समावेश आहे. याचबरोबर एक हाई टेक इनडोअर मल्टी स्पोर्ट्स हॉल आणि बरेच काही येथे पहावयास मिळेल.
येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डान्स आणि म्युजीक स्टुडिओ , व्हिज्युअल आर्ट्स, स्टेम आणि टेक्नॉलॉजी केंद्रित शिक्षणासाठी इनोव्हेशन लॅब आणि आयटी लॅब या सुविधा आहेत. याचसोबत विशिष्ट वयोमर्यादेसाठी संसोरियल गार्डन आणि मैदानी खेळासाठी प्ले एरिया , डे केअर सेंटर ,लहान मुलांसाठी एक अॅक्टिव्हीटी रूम आणि इतर बर्याच गोष्टीं येथे पहावयास मिळतील .
शाळेच्या या कॅम्पस फॅसल्टीचे उद्घाटन अमृता फडणवीस ( भारतीय बँकर, अभिनेत्री, गायीका आणि सामाजिक कार्यकता) यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी दीपप्रज्वलन समारंभाला अमनोरा पार्क टाऊनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, संचालक आदित्य देशपांडे, सीएनएस चेअरपर्सन सुजय जयराज, ट्रस्टी मीनल ठाकर आणि मॅनेजींग ट्रस्टी ऑफ नरसी मोंजी एज्युकेशनल ट्रस्ट जयराज ठाकर आदि उपस्थित होते.
सीएनएस अमनोरा – ही एक आंतरराष्ट्रीय शाळा आहे जी नर्सरी ते इयत्ता १० पर्यंतच्या शिक्षणासाठी खास असे केंब्रिज आयजीसीएसई प्रोग्रॅम प्रदान करते आणि ११ आणि १२ वीच्या हायस्कूल ग्रेडसाठी इंटरनॅशनल बॅकलॉरीएट डिप्लोमा प्रोग्राम प्रदान करते. ही शाळा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्यासाठी आणि विकासासाठी एक आदर्श वातावरण निर्माण करते.
यावेळी या शाळेचे अध्यक्ष सुजय जयराज म्हणाले की, ही शाळा सर्जनशील, कल्पक असे भविष्यातील लिडर्स तयार करण्याचा प्रयत्न करेल.आणि भविष्याची तयारी करण्यासा्ठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. सीएनएस सक्रिय शिक्षणाचे प्रतिध्वनी करते . वर्गाच्या आत आणि बाहेर आयोजित केल्या जाणार्या उपक्रमांद्वारे दृश्यमान विचारसरणीस प्रोत्साहन दिले जाते. भारतीय संस्कृती आणि आचार-विचारांवर आधारित असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यावर आमचा विश्वास आहे,”
आपले विचार व्यक्त करताना आदित्य देशपांडे, संचालक सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणाले, “आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संसाधने देण्यावर विश्वास ठेवतो . आणि याच विचारधारनेस अनुसरून, निवासी, व्यावसायिक, सामाजिक आणि शैक्षणिक सुविधांसह सुसज्ज असे अमानोरा पार्क टाऊन हे टाउनशिप म्हणून विकसित केले गेले आहे. आपल्या ब्रँड आणि उत्कृष्टतेसह चत्रभुज नरसी स्कूल अमनोरा पार्क टाउन हे आंतरराष्ट्रीय शाळांसाठी बेंचमार्क ठरेल.” .
मेथीबाई देवराज गुंदेचा फाउंडेशनच्या ट्रस्टी, मीनल ठाकर पुढे म्हणाल्या, “चत्रभुज भाई हे जीवनात परिवर्तन घडवण्याच्या शिक्षणाच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास ठेवत होते. आम्ही देखील याच तत्त्वज्ञानाचे पालन करू, सोबतच ही संस्था सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या व एका मोठ्या समाज्याचे सदस्य म्हणून विकसित होण्यासाठी खास वातावरण प्रदान करेल याची खात्री करू. शिक्षण हे “ज्ञानाकडून जीवनाकडे” असायला हवे या त्यांच्या दृष्टीकोणाचे आम्ही देखील समर्थक आहोत”.
चत्रभुज नरसी स्कूल विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी आणि स्वावलंबी बनविण्यावर खास लक्ष केंद्रित करते, जे आव्हानांशी दोन हाथ करण्यास तयार असतात आणि जे दृढनिश्चय आणि कौशल्याने नवीन मार्ग तयार करतात. शाळेचे कार्यक्षम आणि वचनबद्ध पद्धत्तीने कार्य करणारे व्यवस्थापक, सक्षम आणि काळजी घेणारे शिक्षक, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण सह-अभ्यासक्रम उपक्रम यामुळे विद्यार्थी आणि पालकांसाठी हा एक समृद्ध अनुभव आहे.
