Tuesday, September 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘सरकारी  वेब साईट्स’ धोक्यात असल्याचे केंद्र सरकारने सांगणे धक्कादायक व नामुष्कीचे..!-काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे – केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सु १२,००० वेब साईट्स धोक्यात असल्याचे वृत्त दस्तूर खुद्द केंद्र सरकारने जारी करणे हे धक्कादायक व नामुष्कीचे आहे, या विषयी डेटा सुरक्षे विषयी व संबंधित ‘इंडोनेशियाच्या हॅक्टीव्हीस्ट’ वर काय कारवाई केली हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

जी-२० चे अध्यक्ष पद क्रमाने आपलेकडे आले असतांना (कोरोना’चे कारण सांगुन) आपण ते इंडोनेशिया ला दिले व इंडोनेशिया देश जी-२० चा सदस्य असुन ही भारताने इंडोनेशियातील हॅक्टीव्हीस्ट विषयी जी-२० मध्ये प्रश्न का उपस्थित केला नाही असा संतप्त सवाल देखील गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
“केंद्र वा राज्यांच्या सरकारी वेब साईट स्लो डाऊन व्हाव्यात., सरकारी सेवांचा लाभ कोणालाही घेतां येऊ नये”..(?) या हेतुने परदेशातील म्हणजेच इंडोनेशीयातील हॅक्टीव्हीस्ट “सरकारी वेब साईट्स” हॅक करण्याची दिलेली धमकी व गुजरात सरकारच्या वेबसाईटवरील हल्ले हे सर्वच भारत देशास खेद जनक, नामुष्कीचे, धक्कादायक व संशयग्रस्त असुन स्व राजीव गांधी मुळे भारतात इंटरनेट क्रांती झालेवर ही पहिलीच नामुष्कीची धक्कादायक घटना भारतात पहायला मिळाली असल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले..!

लोकशाहीत, सरकारे बदलत असतात त्यामुळे ‘विविध सरकारांच्या सत्ताकाळातील विविध योजनांचे सत्य आणि तथ्य हे संकेत स्थळांवर अबाधित असणे गरजेचे आहे..! मोठे ऊद्योगपती ना सोडून विविध लोकाभिमुख व सार्वजनिक हिताच्या योजना, शेतकरी, नागरीकांसाठीच्या लाभकारी योजना इत्यादीं ची माहीती देणाऱ्या ‘सरकारी वेब साईट्स ना धोका संभवतो’.. असे सरकार नेच जाहीर करणे हे योग्य वाटत नसुन, सरकारने तातडीने या सर्व वेबसाईट्स चे बॅकअप हार्डडीस्क वर घ्यावे व ‘जी-२०’ च्या परीषदे मध्ये हा विषय उपस्थित करावा व देशातील जनतेस या सरकारी वेब साईट्स च्या सुरक्षे विषयी आश्वासीत करुन, केंद्र व राज्य सरकारांनी आपले उत्तरदायीत्व पार पाडावे अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
देशातील मोदी सरकार आपल्या वेबसाईट्स (संकेत स्थळांचे) रक्षण करू शकत नसेल तर देशाचे काय करणार (?) असा उपरोधीक सवाल ही गोपाळदादा तिवारीं नी केला

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading