Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

आयएमडीआरमध्ये पदविका प्रदान समारंभ

पुणे : डीईएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा (आयएमडीआर) 48 वा ‘पदविका प्रदान समारंभ’ संस्थेच्या सावरकर सभागृहामध्ये संपन्न झाला. विकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांच्या हस्ते पदविका व पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री मल्होत्रा यांनी पदविका धारकांना गेल्या 70 वर्षातील नवीन शोध, वातावरणीय बदल व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले.

आदित्य पुराणिक यांना सुवर्ण पदक आणि समृद्धी कुलकर्णी यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘सुगम सरिता’ या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बिझिनेस प्लॅन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. पृथा उबगडे आणि प्रा. अमिता कुलकर्णी यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading