Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात सरकारकडून केवळ इव्हेंट्स घेण्याचे काम सुरू आहे : जयंत पाटील

नागपूर :  सध्या राज्यात या सरकारकडून इव्हेंट्स घेण्याचे काम सुरू आहे. लोक कशी गोळा होतील, जिथे लोकं जमा होतात, त्याठिकाणी जाऊन हे सरकार आपली लोकप्रियता दाखवत आहे आपल्या विरोधात बोलेल त्याला नोटीस देण्याचे कामच या सरकारने केलंय, बाकी काहीच या सरकारने काम केले नाही. या राज्यातील जनता निवडणुकांची वाट पाहतोय. परंतु, सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. महाराष्ट्रातील सरकारला आपण जनतेत लोकप्रीय आहोत असे वाटत असे तर त्यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व निवडणुका घ्यावात.  असे आव्हान राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला दिले.

नागपूर शहरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आज पार पडली यावेळी पाटील बोलत होते,  पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले,  नागपूर हा भारताचा केंद्रबिदू आहे. नागपूर ही क्रातिकारकांची भूमी आहे. नागपूरसारखे आदरातिथ्य इतर कुठेच नाही. नागपूरमध्ये आम्ही जेव्हा येतो, तेव्हा त्यावेळी जे ठरवतो ते संपूर्ण देशभरात पोहोचते. नागपूरने एकदा ठरवले, विदर्भाने एकदा पाठींबा द्यायचे ठरवले तर या विदर्भातून आलेला पाठिंबा हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही देशाच्या महासत्तेवर पोहोचवले आहे. विदर्भाने निर्णय केला तर, विदर्भाचा निर्णय देशात पोहोचतो. आमची ही वज्रमुठ विदर्भातल्या शेतकऱ्यांची आहे. विदर्भवासियांची वज्रमुठ राज्य सरकारला विचारतेय की मागच्या 10 महिन्यात तुम्ही काय केल? या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिल काय? महाराष्ट्राच्या जनेतसाठी कोणते निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये विदर्भवासियांना वाटले की, आमच्या नेत्याने आमच्या निर्णय घेतला”

“या सरकारने महाराष्ट्राला सुडाचे राजकारण दिलं. आपल्या बरोबर जे आले नाही , त्यांना संपवण्याचे काम आणि राजकारण महाराष्ट्रात मागील वर्षभरात सुरू आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली. अजित पवारांनी समतोल अर्थसंकल्प मांडला होता. कोर्टाने स्थगिती उडवण्याचे आदेश दिले होते. परंतु, सरकार अद्याप पावलं उचलत नाही”, असेही जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading