जत्रा आणि उरुसातून गावपातळीवर पुस्तके उपलब्ध करण्याचा भाविसा फाऊंडेशनचां प्रयत्न
पुणे – लहान लहान गावात जत्रा , उरूस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून पुस्तकांची विक्री करावी. राष्ट्रीय विचारांची पुस्तके सर्वत्र उपलब्ध व्हावी , त्यातून वाचन संस्कृती विकसित होण्यास मदत होईल असे प्रतिपादन डॉ. शरद कुंटे यानी केले.
भारतीय विचार साधना फाउंडेशनचे अद्ययावत कार्यालय, पुस्तक विक्री केंद्राचे नूतनीकरण आणि पूनार्शुभारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी (१४ एप्रिलला) करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र
वंजारवाडकर , भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. कुंटे म्हणाले, राष्ट्रीय विचारांचा प्रसार करताना पुस्तके महत्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी जर छोट्या गावपातळीपर्यत ती उपलब्ध झाली तर वाचन संस्कृती आणि सुयोग्य जडणघडण होण्यास मदतच होते.
रवींद्र वंजारवाडकर यांनी बौद्धिक विकास करणारे साहित्य निर्माण करत भाविसा आणि वाचकांचे एक नाते तयार झाले आहे. सामाजिक भान जागृत करणारे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवायला हवे असे मत व्यक्त केले.
संदीप गानू यांनी प्रास्ताविक करताना भाविसा फाऊंडेशन म्हणून काम करताना आगामी उपक्रम आणि पुस्तक विक्री योजना आणि विचार यात्रा रथाबद्दल माहिती दिली.
