शुभांगी अत्रेच्या वाढदिवसाचा अंगूरीसोबत खास संबंध आहे!
शुभांगी अत्रे एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील तिची निरागस भूमिका अंगूरी भाभीसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत प्रेक्षकांचे मन जिंकण्यासोबत घराघरामध्ये लोकप्रिय बनली आहे. ११ एप्रिल रोजी स्वत:चा वाढदिवस साजरा करणार असलेली ही प्रतिभावान अभिनेत्री तिच्या वाढदिवसाच्या तिच्या भूमिकेशी असलेल्या खास संबंधाबाबत सांगत आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘‘माझा वाढदिवस अनेक कारणांकरिता माझ्यासाठी खास आहे. एक कारण म्हणजे माझ्या जीवनाला कलाटणी दिलेल्या भूमिकेसाठी होकार देणे. सात वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला मी मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये काम करायला होकार दिला आणि माझी भूमिका टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय भूमिका बनली. माझ्या वाढदिवसाला देवाने मला दिलेली अंगूरी ही सर्वात मोठी भेट आहे आणि मी कायमस्वरूपी त्याचा आनंद घेत राहिन.’’
यंदा वाढदिवस साजरा करण्याबाबतच्या योजनांबाबत सांगताना शुभांगी पुढे म्हणाली, ‘‘अभिनयामधून मला खूप आनंद मिळतो आणि मला माझ्या वाढदिवसाला काम करायला आवडते. मी माझ्या वाढदिवसाला मालिकेसाठी शूटिंग करणार आहे आणि सेटवर माझ्या दुसऱ्या कुटुंबासोबत हा खास दिवस साजरा करणार आहे. वीकेण्डला मी माझी मुलगी व काही मैत्रिणींसोबत मुंबईतील जवळच्या हिल स्टेशनवर जाणार आहोत. आम्ही अजून स्थळ ठरवले नाही, पण मी माझ्या वीकेण्ड गेटवेबाबत खूप उत्सुक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतित करत विश्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो! मी वाचन, चिंतन करेन आणि माझी आवडती गाणी ऐकण्याचा आनंद घेईन.’’ वाढदिवसाला शुभांगी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहण्याचे वचन देते. ती म्हणाली, ‘‘मी माझी स्वप्ने साकारली असल्यामुळे स्वत:ला भाग्यवान मानते आणि माझी अभिनय कौशल्ये अधिक निपुण करण्याची इच्छा आहे. मी प्रेक्षकांना व कुटुंबियांना माझा अभिमान वाटण्यासाठी अभिनेत्री म्हणून माझी सर्वोत्तम कामगिरी करत राहिन. मी आशा करते की, प्रेक्षकांना माझी भूमिका व अभिनय आवडत राहिल.’’
