म. फुलें च्या ‘द्वीशतकोत्तर जयंती-वर्षात देशात ‘सत्यता, समता, ममता व ज्ञानशीलतेचा प्रत्यय येणे, हीच् फुलेंना आदरांजली… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी..
पुणे – स्वातंत्र्यपुर्व भारतात, उच्च-नीच भेदाभेद सोडुन स्वातंत्र्य प्राप्तीच्या ऐक्यासाठी सामाजिक समता व
बंधुभाव जोपासणारी ममता व लोकशाहीरुपी भारताच्या प्राप्ती करीता शिक्षणाचे महत्व विषद करण्याचे महतपुर्ण कार्य महात्मा ज्योतीबा फुलेंनी केले.
त्याची परिणीती म्हणुन म. फुलें च्या ‘द्वीशतकोत्तर जयंती-वर्षात (२०२७), त्यांना अभिप्रेत स्वयंपुर्ण लोकशाहीरुपी प्रजासत्ताक भारतात ‘सत्यता, समता, ममता व ज्ञानशीलतेचा वास्तव प्रत्यय येणे, हीच् फुलेंना आदरांजली ठरेल.. असे उदगार काँग्रेस राज्य प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांनी केले..
‘सत्याची, समतेची व शिक्षणाची’ कास धरणाऱ्या म फुलेंना सामाजिक उध्दारा करीता स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न होते व त्यामुळे स्वातंत्र्योत्तर लोकशाही रुपी भारताची निर्मिती होऊ शकली. राजेशाही व निजामशाहीत विभागलेली भारतीय प्रजा ‘प्रजासत्ताक राष्ट्राचे’ नागरीक बनली.. हे महत्कार्य ज्योतिबा फुलेंच्या साक्षरता व शिक्षणाच्या आग्रही भुमिकेतुन घडले.. मात्त्र विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात, प्रजासत्ताक भारताचे नागरीक मात्र शिक्षणापासून आलेले ‘शहाणपण व सत्यनिष्ठा’ ही लोकशाही हक्कांचे व राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करतांना मात्र हरवत चाललो काय (?) असा प्रश्न पडतो.. असे ऊदीग्न उदगार काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज राजीवगांधी स्मारक समिती वतीने महात्मा ज्योतिबा फुलें च्या जयंती कार्यक्रमात बोलतांना काढले..!
विद्येविना मती गेली.. मती विना निती गेली..!
निती विना गती गेली.. गती विना वित्त गेले..!! इतके अनर्थ एका अविद्येने केले.. ही शिकवण जर महात्मा ज्योतिबांनी सु १५० वर्षांपूर्वी दिली होती.. त्याच शिकवणीचे स्मरण पुन्हा आज ‘लोकशाहीरुपी प्रजासत्ताक भारताच्या नागरीकांना’ करून देणे गरजेचे वाटु लागले आहे असे ही गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले. आभार प्रदर्शन सुर्यकांत (नाना) मारणे यांनी केले..
या प्रसंगी या प्रसंगी, राजीव गांधी स्मारक समितीचे जेष्ठ सदस्य रामचंद्र शेडगे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, ॲड संदिप ताम्हणकर, अविनाश गोडबोले, नितीन पायगुडे, धनंजय भिलारे, संजय अभंग, विकास दवे, नरेश आवटे इ उपस्थित होते..
