Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये मिक्‍की दुदानेचा नाट्यमय प्रवेश!


लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्‍ये अनेक भूमिका साकारण्‍यासह आपल्‍या अविश्‍वसनीय अभिनयासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेला अभिनेता मिक्‍की दुदाने आता एण्‍ड टीव्‍हीवरील कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ’मध्‍ये वरूण शर्माच्‍या भूमिकेत दिसणार आहे. वरूण ही नकारात्‍मक भूमिका आहे, जो यशोदा (नेहा जोशी) व कृष्‍णा (आयुध भानुशाली) यांच्‍या जीवनामध्‍ये नवीन संकट व आव्‍हाने निर्माण करेल.
मालिकेमध्‍ये वरूण शर्माच्‍या भूमिकेत प्रवेशाबाबत मिक्‍की दुदाने म्‍हणाला, ‘‘माझी भूमिका वरूण शर्माचा प्रवेश यशोदा व कृष्‍णा यांच्‍या जीवनामध्‍ये संकट निर्माण करेल, ज्‍यामधून प्रेक्षकांना हाय-व्‍होल्‍टेज ड्रामा पाहायला मिळेल. तो दुष्‍ट योजनेमध्‍ये सामील आहे आणि कृष्‍णाचा खरा वडिल असल्‍याचा दावा करतो. वरूण मोहक आहे आणि त्‍याच्‍या करिष्‍मासह गुप्‍ता कुटुंबाचे लक्ष वेधून घेण्‍याचा त्‍याचा मनसुबा आहे. तो त्‍याच्‍याबाबत मोठ्या बढाया मारतो आणि ही नकारात्‍मक भूमिका आहे. मी यापूर्वी कधीच खलनायकाची भूमिका साकारली नसल्‍यामुळे या भूमिकेने माझे लक्ष वेधून घेतले.’’ मालिका ‘दूसरी माँ’चा भाग असण्‍याबाबत मिक्‍की पुढे म्‍हणाला, ‘‘मला मालिका ‘दूसरी माँ’चा भाग असण्‍याचा आनंद झाला आहे. माझे कुटुंब ही मालिका पाहण्‍याचा आनंद घेतात आणि मी लवकरच या मालिकेमध्‍ये दिसणार असल्‍यामुळे त्‍यांना खूप आनंद झाला आहे. मी या संधीसाठी मालिकेचे दिग्‍दर्शक व सह-निर्माता इम्तियाज पंजाबी यांचे आभार मानतो. मी यापूर्वी त्‍यांच्‍यासोबत काम केले आहे आणि त्‍यांच्‍या दृष्टिकोनावर माझा विश्‍वास आहे. या मालिकेसाठी शूटिंग सुरू करण्‍यापूर्वी मी काही एपिसोड्स पाहिले आणि ते पाहून मी खूप भावूक झालो. हाय-व्‍होल्‍टेज ड्रामा आणि रोचक पात्रांनी माझी मालिकेप्रती रूची वाढवली.’’
सध्‍या जयपूरमध्‍ये मालिकेसाठी शूटिंग करत असलेला अभिनेता पुढे म्‍हणाला, ‘‘मालिकेमधील कलाकार मैत्रीपूर्ण व स्‍वागतार्ह आहेत आणि जयपूरमध्‍ये शूटिंग करताना खूप धमाल येत आहे. मी काही दिवसांपूर्वीच शूटिंगला सुरूवात केली, पण जयपूर अगदी घरासारखे वाटत आहे.’’
मिक्‍की दुदानेला वरूण शर्माच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी पाहत राहा ‘दूसरी माँ’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading