fbpx

डॉ. विकास आबनावे यांच्या ६५ व्या जयंतीनिमित्त आयोजित शिबीरात ५२ दात्यांचे रक्तदान

पुणे : महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास मारुतराव आबनावे यांच्या ६५ व्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ५२ जणांनी रक्तदान केले. डॉ. विकास आबनावे फाउंडेशन, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, ‘रक्ताचे नाते’चे राम बांगड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, युवा उद्योजक विनोद जाधव, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल आदी उपस्थित होते.

संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, संचालक शिरीष आबनावे संचालक दिलीप आबनावे सहसचिव पुष्कर आबनावे, गौरव आबनावे प्रजोत आबनावे प्राजक्ता आबनावे शितल अबनावे आदी उपस्थित होते.

संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत के.ई.एम. रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात संस्थेच्या सभासदांसह, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कुटूंबीय आणि मित्रपरिवारातील अनेकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

डॉ. विकास आबनावे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा झाली. यावेळी सकाळी संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराने डॉ. आबनावे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उल्हास पवार, मोहन जोशी, अरुण खोरे, प्रसाद आबनावे यांनी डॉ. विकास आबनावे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: