fbpx

रामनवमीनिमित्त ‘राम मंत्रव जपिसो’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : कन्नड संघ पुणे यांच्या वतीने रामनवमीचे औचित्य साधून येत्या गुरुवार दि. ३० मार्च रोजी सायं ५.३० वाजता ‘राम मंत्रव जपिसो’ या कन्नड व मराठी अशा दोन्ही भाषेतील भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात कार्यक्रम संपन्न होणार आहे व तो सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर रसिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

या कार्यक्रमात कर्नाटकी शैलीतील सुप्रसिद्ध गायिका विदुषी नंदिनी राव गुजर यांचे सुश्राव्य गायन होईल. नंदिनी या आपल्या वयाच्या ६ व्या वर्षापासून संगीताचे कार्यक्रम करीत असून आजवर त्यांनी १५०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. भक्तीसंगीत गायनात त्यांचा हातखंडा असून आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक व गायक उस्ताद रईस बाले खान यांचे गायन होईल. आपल्या घराण्यातील ते सातव्या पिढीचे कलाकार असून ‘सताररत्न’ पदवीने त्यांचे घराणे ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात त्यांच्या घराण्याचा मोठा वाट आहे. या कार्यक्रमात उस्ताद रईस बाले खान हे भक्तीसंगीत प्रस्तुत करतील. कार्यक्रमाचे निरुपण हे साहित्यिक प्रो. गुरुराज कुलकर्णी करणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: